पॉर्न स्टारला ‘या’ असाध्य रोगाने गाठलं, अवस्था अत्यंत बिकट

मुंबई तक

Jenna Jameson Guillain-Barre syndrome: एकेकाळी प्रसिद्ध पॉर्न स्टार असलेल्या जेना (Jenna Jameson) हिला एका दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे तिला नीट चालता देखील येत नाहीए. जेना Guillain-Barre syndrome ने ग्रस्त आहे. या आजारात व्यक्तीच्या शरीरातील नसा या कमकुवत होतात. डेली स्टारच्या वृत्तानुसार, जेना जेमसनला काही दिवसांपासून नीट चालता येत नव्हते. त्यानंतर तिला रुग्णालयात जावे लागले. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

Jenna Jameson Guillain-Barre syndrome: एकेकाळी प्रसिद्ध पॉर्न स्टार असलेल्या जेना (Jenna Jameson) हिला एका दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे तिला नीट चालता देखील येत नाहीए. जेना Guillain-Barre syndrome ने ग्रस्त आहे. या आजारात व्यक्तीच्या शरीरातील नसा या कमकुवत होतात.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, जेना जेमसनला काही दिवसांपासून नीट चालता येत नव्हते. त्यानंतर तिला रुग्णालयात जावे लागले. रूग्णालयात तपासणीदरम्यान, तिला समजलं की Guillain-Barre syndrome नावाच्या न्‍यूरोलॉजिकल डिस्‍ऑर्डरने ती ग्रस्त आहे. 47 वर्षीय जेना ही अडल्ट इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमुळे ती आता मात्र अंथरुणाला खिळली आहे. तिला आता बेडवरून हलताही येत नाहीए. तिचा पती लिओर बिटनने (Lior Bitton) ती सध्या कोणत्या स्थितीत आहे हे दाखविणारा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या दाम्पत्याला 4 वर्षांची मुलगी देखील आहे. जी आपल्या आईच्या आजारपणामुळे खूपच हळवी झाली आहे.

लिओर या व्हीडिओमध्ये सांगितले की, जेनाचे स्नायू इतके कमकुवत झाले आहेत की, ती स्वतः बाथरूममध्ये देखील जाऊ शकत नाही. लिओर म्हणाला, ‘ती स्वतःहून गेली तर पडते. आता तर मला तिचे पाय धरुन उचलून न्यावं लागतं. तिला स्वतःहून चालता देखील येत नाही.’