‘त्यांच्या सर्वच भूमिका मला मान्य होत्या असं नाही, पण…’, विक्रम गोखलेंच्या निधनानंतर राज ठाकरेंची दीर्घ पोस्ट

मुंबई तक

रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा मनोरंजनाच्या तिन्ही क्षेत्रात अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं. विक्रम गोखले यांच्या निधनानंतर शोक व्यक्त होत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विक्रम गोखले यांच्याबद्दलच्या भावना राज ठाकरे यांनी दीर्घ पोस्ट लिहून व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरेंनी त्यांच्या अभिनयाबद्दल भाष्य […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा मनोरंजनाच्या तिन्ही क्षेत्रात अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं. विक्रम गोखले यांच्या निधनानंतर शोक व्यक्त होत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

विक्रम गोखले यांच्याबद्दलच्या भावना राज ठाकरे यांनी दीर्घ पोस्ट लिहून व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरेंनी त्यांच्या अभिनयाबद्दल भाष्य केलं आहे. त्याचबरोबर विक्रम गोखले यांनी घेतलेल्या भूमिकांबद्दलही मतं व्यक्त केलंय.

राज ठाकरे यांची विक्रम गोखलेंना आदरांजली

राज ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘मुळात रंगमंच, सिनेमा आणि टेलिव्हिजन ह्या तिन्ही माध्यमांमध्ये सराईतपणे अभिनय करू शकणारे अभिनेते दुर्मिळ. त्यात अनेकदा असं जाणवतं आलंय की अनेक अभिनेते जरी तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय करत असले तरी त्यांचा सर्वोत्कृष्ट अभिनय हा कुठल्यातरी एका प्रकारात खुलतो. पण विक्रम गोखले हे ह्याला दुर्मिळ अपवाद होते. तिन्ही माध्यमांवर एकसारखी हुकूमत हे कमालच. त्यांची संवादफेकी उत्तम होतीच पण चेहऱ्यावरचे हावभाव आणि डोळ्यातून देखील बोलण्याची त्यांची हातोटी कमला होती.’

‘देहबोली, डोळ्यातून भाव व्यक्त करण्याचं कसब असलेला भारदस्त अभिनेता!’ विक्रम गोखलेंच्या निधनानं राजकारणीही भावूक

राज ठाकरेंनी पुढे म्हटलंय की, ‘तीन पिढ्यांचा अभिनयाचा वारसा घेऊन आणि तो ही उत्तम अभिनयाचा वारसा घेऊन ह्या क्षेत्रांत उतरायचं आणि स्वतःला सिद्ध करायचं हे कठीण असतं, पण विक्रम गोखलेंना ते सहज पेललं.’

Vikram Gokhale : विक्रम गोखलेंचे ‘हे’ चित्रपट कायम राहतील आठवणीत, तुम्ही बघितले आहेत का?

‘मला अजून एका बाबतीत विक्रम गोखले आवडायचे, ते म्हणजे राजकीय भूमिका घेताना कचरत नसत आणि ते कमालीचे धर्माभिमानी होते. त्यांच्या सर्वच भूमिका काही मला मान्य होत्या असं नाही, पण किमान ते भूमिका घ्यायचे हे विसरता येणार नाही. भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा हा कलावंत आज आपल्यातून निघून गेला. विक्रम गोखलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन’, अशा शब्दात राज ठाकरेंनी विक्रम गोखलेंना श्रद्धांजली अपर्ण केलीये.

हे वाचलं का?

    follow whatsapp