मुंबईच्या 'सुपरकॉप'ची कहाणी मोठ्या पडद्यावर, राकेश मारियांच्या आयुष्यावर चित्रपटाची घोषणा

रोहित शेट्टी करणार चित्रपटाचं दिग्दर्शन, सोशल मीडियावर शेअर केला फोटो
मुंबईच्या 'सुपरकॉप'ची कहाणी मोठ्या पडद्यावर, राकेश मारियांच्या आयुष्यावर चित्रपटाची घोषणा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि अनेक दहशतवाद्यांसह शहरातील अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडणारे राकेश मारिया यांच्या आयुष्यावर आता चित्रपट येणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने Reliance Entertainment च्या सहाय्याने मारियांच्या आयुष्यावर बायोपिकची घोषणा केली आहे,

राकेश मारियांनी आपल्या 36 वर्षांच्या कारकिर्दीत दहशतवादाविरुद्ध मोठी लढाई लढली आहे. 1993 साली मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटापासून ते 26/11 हल्ल्यापर्यंत राकेश मारियांनी आपलं काम चोखपणे करुन दाखवलं आहे. अशा पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यावर चित्रपट बनवणं हे माझं भाग्य आहे, अशी प्रतिक्रीया रोहित शेट्टीने दिली आहे.

कोण आहेत राकेश मारिया?

राकेश मारिया हे 1981 च्या IPS बॅचचे अधिकारी आहेत. 1993 साली DCP Traffice या पदापासून मुंबईत कामाला सुरुवात केलेल्या राकेश मारियांनी मुंबई बॉम्बस्फोटाचा तपास केला होता. यानंतर राकेश मारिया DCP Crime आणि JCP Crime या पदावर काम केलं. 2003 साली गेट वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार येथे झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटाचा तपास राकेश मारिया यांनी केला होता. याचसोबत मुंबईतील 26/11 हल्ल्यात जिवंत पकडलेला आरोपी अजमल कसाबची चौकशी करण्यातही राकेश मारिया यांनी मोलाची भूमिका बजावली होती.

Related Stories

No stories found.