मराठमोळा अभिनेता शशांत केतकर ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून लोकप्रिय झाला. शिवाय आता तो पाहिले न मी तुला या नव्या मराठी मालिकेमध्येही झळकणार आहे. तर शशांकच्या चाहत्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे शशांकची बहीण दिक्षा केतकर देखील छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
‘तू सौभाग्यवती हो’ या नव्या मालिकेच्या माध्यमातून दिक्षा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिक्षाच्या या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेत दिक्षासोबत ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरु दिवेकर तसंच प्रिया करमरकर हे कलाकारही झळकणार आहेत. दिक्षाची ही पहिलीच मालिका असल्याने तिच्यासाठी ती फार खास असणार आहे.
दिक्षाही तिच्या पहिल्या मालिकेसाठी फार उत्सुक असल्याचं कळतंय. पहिल्या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिक्षा फार निरागस दिसतेय. शिवाय या नव्या चेहऱ्याला पाहण्यासाठी लोकंही फार उत्सुक आहेत.
दिक्षाची पहिली मालिका तू सौभाग्यवती हो याचा प्रोमो तिचा भाऊ आणि अभिनेता शशांक केतकरने इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. या प्रोमोला कॅप्शन देताना, ‘सुपर एक्साईडेट तसंच मला तुझा फार अभिमान आहे’, असं शशांकने म्हटलंय.