Sohail Khan Divorce:सलमानचा भाऊ सोहेलचा घटस्फोट, सीमासोबत २४ वर्षांचं नातं संपुष्टात

Sohail Khan DIVORCE : सलमान खानच्या कुटुंबातला हा दुसरा घटस्फोट आहे
Sohail Khan Divorce:सलमानचा भाऊ सोहेलचा घटस्फोट, सीमासोबत २४ वर्षांचं नातं संपुष्टात
Salman Khan's brother Sohail Khan and Seema Khan taking divorce after 24 years of marriage

Sohail Khan DIVORCE : सलमान खानचा लाडका लहान भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान हे दोघंही विभक्त होणार आहेत. या दोघांना मुंबईतल्या फॅमिली कोर्टाबाहेर पाहिलं गेलं आहे. या दोघांनाही घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं समजतं आहे. दोघांना कोर्टातून वेगवेगळं बाहेर पडताना पाहिलं गेलं. या दोघांनीही २४ वर्षांचा संसार संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

समोर आलेल्या रिपोर्टनुसार, सोहेल खान आणि सीमा सचदेव हे दोघेही फॅमिली कोर्टात उपस्थित झाले होते. दोघांमधली मैत्री मात्र अद्यापही कायम आहे. या दोघांपैकी कुणीही विभक्त होत असल्याचं अधिकृतरित्या सांगितलेलं नाही. मात्र सोहेल खानच्या फॅन्ससाठी ही नक्कीच धक्कादायक बातमी आहे.

कोर्टातून बाहेर पडताना सीमा खान

कोण आहे सीमा खान?

सीमा खानचं खरं नाव सीमा सचदेव आहे. ती फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट आहे. ही बातमीही समोर आली आहे की तिने एक सलॉन सुरू केलं आहे. त्या सलॉनचं नाव Kallista आहे. सुझैन खान आणि महीप कपूर यांच्यासह मुंबईतल्या बांद्रा या ठिकाणी १९० लक्झुरियस बूटिकही सुरू केले होतं.

सोहेल खान कोर्टातून बाहेर पडताना

सोहेल खान आणि सीमा यांचं लग्न १९९८ मध्ये झालं होतं. या दोघांना दोन मुलं आहे. या दोघांची नाव योहान आणि निर्वाण अशी आहेत. २०१७ मध्येही सोहेल आणि सीमा वेगळं होणार आहेत अशा बातम्या आल्या होत्या. एवढंच नाही तर नेटफ्लिक्सवर आलेला शो द फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स मध्येही वेगवेगळं पाहिलं होतं. या शोनंतर या चर्चा सुरू झाल्या होत्या की सीमा आणि सोहेल वेगळे होणार आहेत.

सोहेलबाबत आपलं नातं कसं आहे? हे सांगताना सीमा या शोमध्ये हे म्हणाली होती की जेव्हा तुम्ही मोठे होत जाता, वय वाढत जातं तसं तुमची नाती वेगवेगळ्या दिशेला जाऊ लागतात. मी यामुळे दुःखी नाही. आम्ही खुश आहोत कारण आमची मुलंही खुश आहेत. सोहेल आणि माझं लग्न पारंपरिक पद्धतीने टिकलेलं नाही. मात्र आम्ही एकाच कुटुंबात आहोत. आता आमच्यासाठी आमची मुलं आवश्यक आहेत, असं तिने म्हटलं होतं. सलमान खानच्या कुटुंबातला हा दुसरा घटस्फोट आहे. याआधी अरबाझ आणि मलायका यांचा घटस्फोट झाला आहे.

Related Stories

No stories found.