आजारी मेहुणी घरी एकटी असल्याचं कळताच अचानक घरात घुसला अन् बळजबरीने घृणास्पद कृत्य...

मुंबई तक

आपल्या आजारापणाच्या उपचारांसाठी माहेरी आलेल्या मेहुणीवर तिच्या दाजीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडिता घरी एकटी असल्याचं पाहून आरोपीने तिच्यावर घृणास्पद कृत्य केलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आजारी मेहुणी घरी एकटी असल्याचं कळताच अचानक घरात घुसला अन्

point

मेहुणीवर केला बलात्कार

Rape Case: आपल्या आजारापणाच्या उपचारांसाठी माहेरी आलेल्या मेहुणीवर तिच्या दाजीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडिता घरी एकटी असल्याचं पाहून आरोपीने तिच्यावर घृणास्पद कृत्य केलं. घटनेनंतर, पीडित महिलेची आई घरी परतल्यानंतर आरोपी तिला देखील धमकी देऊन तिथून पसार झाला. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे ही संतापजनक घडना घडल्याची माहिती आहे. प्रकरणातील पीडितेने अखेर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि आरोपी दाजीविरुद्ध तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं जात आहे.

ग्वाल्हेरच्या थाटीपूर पोलिस स्टेशन परिसरातील 60 फुटा रोड येथील रहिवासी असलेल्या 19 वर्षीय महिलेचं लग्न कंपू परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत झालं होतं. काही दिवसांपासून पीडिता आजारी असल्याकारणाने तिची प्रकृती खालावत चालली होती आणि त्यामुळे ती उपचारांसाठी ग्वाल्हेर येथे आपल्या माहेरी आली होती. 

हे ही वाचा: जुळ्या भावांना डेट करतीये महिला, गरोदर झाली तर करणार DNA टेस्ट!

घरी एकटी असल्याचं कळताच घरात घुसला अन्...  

दरम्यान, संबंधित महिलेचा तिच्या आतेबहिणीच्या पती धर्मवीरशी सतत संपर्क असायचा. याच काळात, पीडिता आपल्या माहेरच्या घरी एकटी होती आणि तिची आई तसेच भाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते. तेव्हा तिला तिचा दाजी धर्मवीरचा फोन आला आणि बोलणं सुरू असताना त्याला कळलं की मेहुणी घरी एकटी आहे. त्यानंतर, त्याने फोन ठेवला आणि थोड्याच वेळात तो तिच्या घरी आला. 

मेहुणीवर बलात्कार  

घरात येताच, आरोपी दाजीने घराचं दार बंद केलं आणि आपल्या आजारी मेहुणीवर जबरदस्तीने बलात्कार केला. दरम्यान, पीडितेची आई घरी परतली आणि तिला पाहताच आरोपीने तिला धमकी देऊन घरातून पळ काढला. घटनेतील पीडित महिलेने तिच्या पतीला आपल्या दाजीच्या घाणेरड्या कृत्याची माहिती दिली आणि त्याला थेट पोलिस ठाण्यात घेऊन गेली. दोघांनी मिळून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि पीडित महिलेच्या तक्रारीवरून, आरोपी दाजीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध घृणास्पद कृत्य केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच, त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp