जुळ्या भावांना डेट करतीये महिला, गरोदर झाली तर करणार DNA टेस्ट!
Thai woman dates twin brothers at once : फाह तिचे शिक्षण पूर्ण करत असतानाच तिघांनी डेटिंग सुरू केली. विशेष म्हणजे, दोन्ही कुटुंबीयांनी या नात्याला पाठिंबा दिला आहे. थायलंडमधील माध्यम संस्था खाओसोदच्या माहितीनुसार, सुआ आणि सिंग हे फाहपेक्षा एक वर्षाने लहान असून ते कृषी यंत्रसामग्री सेवा क्षेत्रात काम करतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जुळ्या भावांना डेट करतीये महिला
गरोदर झाली तर करणार DNA टेस्ट!
Thai woman dates twin brothers at once : थायलंडच्या ईशान्य भागातील एका तरुणीच्या अनोख्या प्रेमसंबंधाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. येथील एक महिला एकाच वेळी जुळ्या भावांना डेट करत असल्याची माहिती समोर आलीये. सध्या तिघंही एकत्र राहत असून, त्यांच्या नात्याला दोन्ही कुटुंबांची संमतीही मिळाल्याचे समोर आले आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, थायलंडमधील नाखोन फानोम येथील 24 वर्षीय तरुणी फाह हिने आपल्या अपरंपरागत नात्याबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर केल्यानंतर ती चर्चेत आली आहे. फाह गेल्या वर्षभरापासून नात्याच्या शोधात होती. त्याच दरम्यान सुआ आणि सिंग या जुळ्या भावांनी तिच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला जुळ्या भावांमध्ये लहान असलेल्या सुआने फाहला मेसेज पाठवला आणि नंतर आपल्या भावालाही तिच्याशी बोलण्यासाठी प्रोत्साहित केले.
हेही वाचा : 'मला तर अक्षरश:...', राज ठाकरे पहिल्यांदाच KDMC बाबत बोलले.. तेही उद्धव ठाकरेंच्या समोरच!
दोन्ही कुटुंबीयांनी या नात्याला दिला पाठिंबा
फाह तिचे शिक्षण पूर्ण करत असतानाच तिघांनी डेटिंग सुरू केली. विशेष म्हणजे, दोन्ही कुटुंबीयांनी या नात्याला पाठिंबा दिला आहे. थायलंडमधील माध्यम संस्था खाओसोदच्या माहितीनुसार, सुआ आणि सिंग हे फाहपेक्षा एक वर्षाने लहान असून ते कृषी यंत्रसामग्री सेवा क्षेत्रात काम करतात. फाहने माध्यमांशी बोलताना हे नाते स्थिर आणि समाधानकारक असल्याचे सांगितले. तिघेही सुरुवातीपासून एकत्र राहत असून, दैनंदिन जबाबदाऱ्या आणि घरखर्च मिळून सांभाळतात. फाह एका रेस्टॉरंटमध्ये काम करते. ग्राहकांना जेवण वाढण्यापासून ते स्वयंपाकघरातील कामांपर्यंत ती सर्व जबाबदाऱ्या पार पाडते. ती महिन्याला 10 हजार बात (सुमारे 320 अमेरिकन डॉलर्स) पेक्षा अधिक कमाई करते.










