मुलगी झाली हो मालिकेत येणार नवा ट्विस्ट,बिग बॉस फेम या अभिनेत्रीची होणार मालिकेत नवीन एंट्री

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिकेचं कथानक अतिशय रंगतदार वळणावर आलं असून मालिकेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची एण्ट्री होणार आहे. शर्मिष्ठा नीलिमा सावंत ही व्यक्तिरेखा साकारणार असून नीलिमाच्या येण्याने मालिकेत नवं वळण येणार आहे. माऊने सिद्धांत सोबत लग्नासाठी नकार दिला असून लग्न करेन तर शौनकशी असं ठामपणे सांगितलं आहे.

माऊने जरी लग्नासाठी नकार दिला असला तरी सिद्धांत हार मानायला तयार नाही. नीलिमाचा वापर करुन तो माऊचे वडिल म्हणजेच विलास पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणार आहे.सिद्धांत आणि नीलिमाचा डाव यशस्वी होणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेलच. पण नीलिमा सावंत या भूमिकेच्या निमित्ताने शर्मिष्ठाचा नवा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT