अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि शिवसेना नेत्याचा साखरपुडा संपन्न, पाहा व्हिडीओ

मुंबई तक

Actress Tejaswini Lonari and Shiv Sena leader Samadhan Saravankar get engaged : शिवसेना पक्षाचे युवा नेते समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचा कुटुबियांच्या उपस्थितीत साखरपुडा पडला पार !

ADVERTISEMENT

Marathi News
Marathi News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि शिवसेना नेत्याचा साखरपुडा संपन्न

point

सोशल मीडियावर या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकारण आणि कला क्षेत्राचा सुंदर संगम घडवणारा एक सोहळा नुकताच पार पडला. शिवसेना पक्षाचे युवा नेते समाधान सरवणकर आणि लोकप्रिय अभिनेत्री तसेच निर्माती तेजस्विनी लोणारी यांचा साखरपुडा कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. हा साखरपुडा पारंपरिक पद्धतीने पार पडला. दोघांच्या कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने या सोहळ्याला उपस्थित राहून नव्या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

हेही वाचा : मोठी बातमी: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला वेगळंच वळण; आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिसांना शरण...

तेजस्विनी लोणारी ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री असून तिने छापा काटा, वान्टेड बायको नंबर वन, गुलदस्ता, अफलातून, कलावंती यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने अनेक मराठी मालिकांमध्ये देखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. दुसरीकडे, समाधान सरवणकर हे शिवसेनेचे सक्रिय युवा नेते असून ते मुंबईतील राजकारणात सक्रिय भूमिका बजावत आहेत. सोशल मीडियावर या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. दोघांना चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून “परफेक्ट कपल” म्हणून त्यांचे कौतुक केले जात आहे. लवकरच विवाहसोहळा पार पडणार असल्याची चर्चा सुरू असून चाहत्यांमध्ये या जोडप्याच्या लग्नाची उत्सुकता वाढली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp