Adipurush Collection : निर्मात्यांवर टीकेचा भडीमार, पण आदिपुरुषने केली मोठी कमाई केली?
आदिपुरुषने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अनेक अंदाज चुकवत चित्रपटाने धमाकेदार कमाई केली.
ADVERTISEMENT

Adipurush Latest Update : मनोरंजन विश्वात एक वादाचा मुद्दा ठरला आहे आदिपुरुष! सध्या भारतात सर्वाधिक चर्चेत असलेला हा चित्रपट ठरला आहे. अभिनेता प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका साकारलेला हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. व्हीएफएक्स आणि अॅनिमेशनच्या मदतीने रामायण पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चित्रपट वादग्रस्त ठरला. निर्मात्यांपासून संवाद लेखकापर्यंत सगळेच टीकेचे धनी ठरले आहेत. असं असलं तरी आदिपुरुषने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अनेक अंदाज चुकवत चित्रपटाने धमाकेदार कमाई केली. (Adipurush Collection)
प्रभासचा आदिपुरुष हा भारतातच 100 कोटींची कमाई करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला. आणि जगभरात एकूण 140 कोटींच्या कलेक्शनसह, त्याने शाहरुख खानच्या पठाणलाही मागे टाकले आहे. प्रभास आदिपुरुष असलेला पहिला भारतीय स्टार बनला आहे, ज्याच्या तीन चित्रपटांना पहिल्याच दिवशी जगभरात 100 कोटींहून अधिकची ओपनिंग मिळाली आहे. पण आदिपुरुषलाही अनेक वादांना सामोरे जावे लागत आहे.
चित्रपटातील संवादांवर लोकांकडून आक्षेप घेतला जात आहेत आणि रामायणाची मूळ कथा बदल करून दाखवणेही प्रेक्षकांच्या पचनी पडलेले नाही. या दोन्ही गोष्टींमुळे चित्रपटावर बरीच टीका होत आहे आणि त्यावर खूप नकारात्मक प्रतिक्रियाही उमटत आहेत. मात्र, या गोष्टींचा परिणाम आदिपुरुषच्या कमाईवर होताना दिसत नाही.
दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर जोरदार कलेक्शन
आदिपुरुषने पहिल्याच दिवशी हिंदीमध्ये 37.25 कोटी रुपये, तेलगूमध्ये 48 कोटी रुपये आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर 86.75 कोटी रुपयांची ग्रँड ओपनिंग मिळवली. जगभरातील चित्रपटाचे कलेक्शन 140 कोटींवर पोहोचले आहे.