Adipurush च्या निर्मात्यांसह उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डालाही घेतलं फैलावर
आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीये. चित्रपट प्रदर्शित होऊन दहा दिवस उलटले तरी चित्रपटाबाबत सुरू असलेला वाद थांबलेला नसून, त्यात आणखी वाढ होत आहे.
ADVERTISEMENT

Adipurush Critics : आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीये. चित्रपट प्रदर्शित होऊन दहा दिवस उलटले तरी चित्रपटाबाबत सुरू असलेला वाद थांबलेला नसून, त्यात आणखी वाढ होत आहे. चित्रपटातील संवादांवर आक्षेप घेतला गेला आणि प्रचंड जनक्षोभ या चित्रपटाच्या विरोधात दिसला. मात्र आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांना आक्षेपार्ह संवाद आणि वादग्रस्त दृश्यांसाठी चित्रपट निर्मात्याला नोटीस पाठवली आहे.
सेन्सॉर बोर्डाला फटकारले
27 जून रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने चांगलंच फटकारले आणि CBFC म्हणजेच सेन्सॉर बोर्डाच्या वतीने सुनावणीस हजर असलेल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांना विचारले की, आक्षेपार्ह दृश्ये, कपडे आणि दृश्यांबद्दल काय केले जात आहे? या धर्माचे लोक खूप सहिष्णू आहेत असे म्हणून आम्हीही डोळे मिटवून घ्यायचे का? ते सहिष्णू आहेत, त्यांच्या सहिष्णूतेची कसोटी घ्यायची का? ही सहनशक्तीची परीक्षा आहे का? ही कोणत्याही प्रोपेगेंडाअंतर्गत केलेली याचिका नाही.
हेही वाचा >> Narendra Modi Speech : उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे अजूनही खुले आहेत?
यासोबतच हायकोर्टाने असेही विचारले की, सेन्सॉर बोर्डाने आपली जबाबदारी पार पाडली आहे का? हे चांगले आहे की हे त्या धर्माबद्दल आहे, ज्यातील लोकांनी सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला नाही. येथे प्रभू राम, हनुमान आणि माता सीता जसे आहेत असे दाखवले आहेत.
आदिपुरुष टीमला नोटीस बजावली
आदिपुरुष चित्रपटातील माँ सीता, हनुमान आणि इतर पौराणिक पात्रांचे चित्रण आक्षेपार्ह असल्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने म्हटले आहे. या कारणास्तव चित्रपट निर्माते, संवाद लेखक यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोर सीबीएफसीला म्हणजे सेन्सॉर बोर्डाला अशी विचारणा केली आहे की, चित्रपटाला रिलीजची परवानगी देण्यापूर्वी काय पावले उचलली गेली होती?










