‘टॉयलेट साफ करण्यासापासून ते…’; अमिताभ बच्चन यांना करावी लागताहेत सर्वच कामं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. बिग बी सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना सतत अपडेट्स देत असतात. बच्चन यांनी आता एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे बिग बींनी सांगितले की, त्यांना कोविडमध्ये कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ADVERTISEMENT

स्वतःलाच करावी लागत आहे सर्वच कामं

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नवीन ब्लॉगमध्ये कोविडमध्ये येणाऱ्या समस्यांचा उल्लेख केला आहे. बिग बींच्या ब्लॉगनुसार, नवीन स्टाफला गोष्टी समजावून सांगणे कठीण जात आहे. यामुळेच अमिताभ बच्चन यांना त्यांची सर्व कामे स्वत: करावी लागत आहेत. बच्चन लिहितात, कोविड झाल्यानंतर मी माझी सर्व कामे स्वत: करत आहे. मी कपडे धुण्याचे काम करतो. मी फरशी साफ करत आहे. मी स्वतः टॉयलेट साफ करत आहे, अशी माहिती त्यांनी दिलीय.

हे वाचलं का?

बिग बी पुढे लिहितात की मीच सर्व स्विच चालू आणि बंद करत आहे. चहा आणि कॉफी बनवत आहे. मी फोनवर बोलत ही सगळी कामं करत आहे. यावेळी बिग बींकडे एकही परिचारिका नाही. त्यामुळे त्यांना त्यांची औषधे स्वतःच घ्यावी लागत आहे.

‘खूप मजेशीर आणि आत्म-समाधान करणारा अनुभव’ : अमिताभ बच्चन

ADVERTISEMENT

अमिताभ बच्चन कोविडमुळे नक्कीच थोडे अडचणीत आले आहेत. पण सर्व काम करण्यात त्यांना मजा येत आहे. बिग बी लिहितात की हा खूप मजेशीर आणि आत्म-समाधान करणारा अनुभव आहे. यामुळे तो स्वतंत्रपणे सर्व कामे करत आहे. आता ते कोणत्याही कामासाठी कर्मचाऱ्यांवर अवलंबून नाहीत. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनाही जाणवत आहे की त्यांच्या कामगारांना दिवसभर खूप काम करावे लागते. आपल्याला त्यांच्याबद्दलच आदर आणखी वाढलं आहे, असं बिग बी म्हणतात. कर्मचाऱ्यांचा सन्मान केला पाहिजे असं देखील बिग बींच म्हणणं आहे. ही सर्व माहिती त्यांनी ब्लॉगच्या माध्यमाने दिली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT