Anupamma: मनोरंजन विश्वाला एकाच दिवशी दोन धक्के, हरहुन्नरी अभिनेत्याचं निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

anupamaa actor nitesh pandey died got cardiac arrest bollywood industry shock
anupamaa actor nitesh pandey died got cardiac arrest bollywood industry shock
social share
google news

Nitesh Pandey Passed Away : बॉलिवूड इंडस्ट्रीत एका मागून एक कलाकारांच्या निधनाची मालिका सुरु आहे. दोनच दिवसापुर्वी बॉलिवूड अभिनेता आदित्य सिंह राजपुत (Aditya Singh Rajput) याच्या आत्महत्येची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज दोन कलाकांरानी जगाचा निरोप घेतला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायचे (Vaibhavi Upadhay) कार अपघातात निधन झाले. तर प्रसिद्ध मालिका अनुपमा फेम नितेश पांडे (Nitesh Pandey) यांचा कार्डिअ‍ॅक अरेस्टने निधन झाले. वयाच्या 51 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये त्यांच्या निधनाची ही घटना घडली. या घटनेने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दरम्यान आता या कलाकारांना बॉलिवूड इंडस्ट्रीतून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. (anupamaa actor nitesh pandey died got cardiac arrest bollywood industry shock)

ADVERTISEMENT

प्रोड्युसर सिद्धार्थ नागर यांनी या नितेश पांडे (Nitesh Pandey) यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “हो तुम्ही बरोबर ऐकले आहे. नितेश पांडे आता राहिले नाही, माझी बहीण अर्पिता पांडे हिला धक्का बसला आहे. आम्ही पूर्णपणे सुन्न झालो आहोत, या दुर्घटनेनंतर मला अर्पिताशी बोलताही आले नाही,असे नागर म्हणाले आहेत. नितेश पांडे (Nitesh Pandey) यांच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. अनुपमा या मालिकेतून नितेश पांडे घराघरात पोहोचले होते. टीव्ही मालिकेसह त्यांनी अनेक चित्रपटात देखील काम केले होते. गेल्या 25 वर्षापासून ते इंडियन टेलिव्हिजनचा पॉप्युलर चेहरा होते. त्यामुळे नितेश पांडे यांच्या अचानक निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा : कार कोसळली दरीत! अभिनेत्रीचा भयंकर अपघातात मृत्यू

‘या’ सिनेमा, मालिकेत अभिनय केला…

नितेश यांनी 1990 मध्ये थिएटरमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ते अनेक हिंदी चित्रपटात आणि टीव्ही शोमध्ये दिसले होते. ओम शांती ओम सिनेमात शाहरूख खानच्या असिस्टंटचा देखील त्यांनी अभिनय केला होता. यासह बधाई दो, रंगून, हंटर, दबंग 2, मेरे यार की शादी आणि मदारी सारख्या सिनेमात त्यांनी अभिनय केलाय. तसेच टीव्ही शोज बद्दल बोलायचं झालं तर, अस्तित्व…एक प्रेम कहाणी, हम लडकिया, इंडियावाली मॉ, हिरो-गायब मोड ऑन यांसारख्या मालिकेत देखील त्यांनी काम केले होते.

हे वाचलं का?

नितेश पांडेच्या वैयक्तित आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, 1998 साली नितेशने अभिनेत्री अश्विनी काळसेकर सोबत लग्न केले होते. पण त्यांचे हे लग्न फार काळ टिकलं नाही. 2002 साली या दोघांना तलाक घेतला होता. यानंतर नितेशने टीव्ही अभिनेत्री अर्पिता पांडेशी लग्न केले होते. मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. नितेशला एक मुलगा आहे, जो खुप सुंदर दिसतो.नितेशच्या या निधनाने त्याची बायको अर्पिता आणि मुलासह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा : ‘गंदी बात’ फेम अभिनेत्याचं निधन, ड्रग्सच्या ओव्हरडोसने मृत्यू?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT