अनुराग आणि तापसीच्या चौकशीत नेमकं काय सापडलं?

मुंबई तक

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि फिल्म डिरेक्टर सध्या इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आहेत. अनुराग आणि तापसीच्या घरी काल इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत इन्मक टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तापसी आणि अनुराग यांची चौकशी करण्यात आली. यावेळी दोघांचीही जवळपास सहा तास चौकशी केली. इन्कम टॅक्सकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारावर अनुराग आणि तापसीची चौकशी करण्यात आली. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि फिल्म डिरेक्टर सध्या इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आहेत. अनुराग आणि तापसीच्या घरी काल इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत इन्मक टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तापसी आणि अनुराग यांची चौकशी करण्यात आली. यावेळी दोघांचीही जवळपास सहा तास चौकशी केली. इन्कम टॅक्सकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारावर अनुराग आणि तापसीची चौकशी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग आणि तापसीच्या घरांवर जी छापेमारी करण्यात आली आहे ती आणखीन 3 दिवस सुरु असण्याची शक्यता आहे. कारण इन्मक टॅक्सवर अधिका्यांना बर्याेच डिजिटल कागदपत्रं गोळा करायची असून त्यासाठीच वेळ लागत असल्याची माहीती आहे.

फँटम फिल्मशी संबंधित सेलिब्रेटींच्या मालमत्तांवर इन्कम टॅक्स विभागाने बुधवारी छापे टाकले. इन्कम टॅक्स विभागाने बुधवारी या दोघांच्या मुंबई आणि पुण्यातील घर आणि ऑफिस याठिकाणी छापेमारी केली. यावेळी सर्च ऑपरेशनमध्ये काही कागदपत्र, लॅपटॉप तसंच इतर अनेक इलेक्ट्रिनिक वस्तूंची तपासणी केली. काल दुपारपासून इन्कम टॅक्सचं पथक या मालमत्तांची तसंच कर चोरी प्रकरणाचा तपास करतंय.

हे वाचलं का?

    follow whatsapp