फॅन्सच्या गर्दीतून बाहेर पडताना दीपिकाची खेचली पर्स

मुंबई तक

बॉलिवूड सेलिब्रिटी बाहेर पडले गर्दी ही होतेच. अशावेळी गर्दीतून बाहेर पडणं सेलिब्रिटींसाठी फार मुश्किल होऊन बसतं. नुकतंच दीपिका पदुकोण एका फूड आऊटलेटवर खाण्यासाठी बाहेर पडली असता तिला फॅन्सच्या गर्दीचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर या गर्दीदरम्यान तिची पर्स खेचण्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीपिकाची गर्दीमध्ये पर्स खेचण्याचा हा धक्कादायक प्रकार कॅमेरामध्ये कैदही झाला आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बॉलिवूड सेलिब्रिटी बाहेर पडले गर्दी ही होतेच. अशावेळी गर्दीतून बाहेर पडणं सेलिब्रिटींसाठी फार मुश्किल होऊन बसतं. नुकतंच दीपिका पदुकोण एका फूड आऊटलेटवर खाण्यासाठी बाहेर पडली असता तिला फॅन्सच्या गर्दीचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर या गर्दीदरम्यान तिची पर्स खेचण्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दीपिकाची गर्दीमध्ये पर्स खेचण्याचा हा धक्कादायक प्रकार कॅमेरामध्ये कैदही झाला आहे. हा व्हीडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गुरुवारी रात्री दीपिकाला स्पॉट करण्यात आलं. या ठिकाणी फॅन्सची मोठी गर्दी झाली. या गर्दीतून बाहेर पडणं दीपिकासाठी फारच मुश्किलीचं झालं. याचवेळी दिपीका गाडीत बसायला जात असताना एका महिलेने दिपीकाची पर्स खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र दिपीकासोबत असलेल्या व्यक्तींनी तातडीने महिलेच्या हातातून पर्स सोडवून घेतली.