बॉक्स ऑफिसवर Gadar 2! 9 दिवसांत केली रेकॉर्डब्रेक कमाई, किती कोटी कमावले?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

gadar 2 box office collection 9th day earning beats bahubali movie
gadar 2 box office collection 9th day earning beats bahubali movie
social share
google news

बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या गदर 2 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. या सिनेमाने सलग 9 व्या दिवशी कमाईचा धडाका लावला आहे.या कमाईमुळे आता गदर 2 सिनेमा 300 कोटी क्लबमध्ये पोहोचला आहे. यामुळे शाहरूख खानच्या पठाण सिनेमानंतर गदर 2 सिनेमा हा 300 कोटी क्लबमध्ये सामील होणारी दुसरा सिनेमा ठरला आहे. दरम्यान आता गदर 2 सिनेमाने नेमकी किती कोटींची कमाई केली आहे? कोणते रेकॉर्डस् ब्रेक केले आहेत? हे जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

गदर 2 सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात तुफान कमाई केली आहे. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात देखील सिनेमाने कमाईचा तोच वेग कायम ठेवला. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या इतिहासात आतापर्यंत कोणताच सिनेमाने दु्सऱ्या शुक्रवारी इतकी कमाई करू शकला नव्हता, जितकी कमाई गदर 2 ने केली आहे. गदर 2 चा दुसरा शनिवार देखील रेकॉर्डब्रेक राहिला आहे.

हे ही वाचा : Taali Series: ‘अबनॉर्मल’ ते ‘नॉर्मल’ होण्याचा प्रवास!

9 व्या दिवसाची कमाई

दुसऱ्या शनिवारी गदर 2 सिनेमाने कमाईत मोठी झेप घेतली आहे. ट्रेड रिपोर्ट्नुसार शुक्रवारच्या कमाईच्या तुलनेत शनिवारी सिनेमाने 50 टक्के जास्त कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या 6 दिवसात सिनेमाने दररोज 30 करोडहून अधिक कमाई केली आहे. 9 व्या दिवशी सिनेमाने 32-33 करोडचा व्यवसाय केला. त्यामुळे भारतात या सिनेमाने आता 335 कोटीचा गल्ला जमवला आहे. जर सिनेमाच्या कमाई अशीच सुरु राहिली तर सिनेमा 400 कोटीचा आकडा गाठण्याचीही शक्यता आहे. दरम्यान आजच्या रविवारच्या दिवसाच्या कमाईवर हा सिनेमा 400 कोटी गाठतो की नाही, हे निर्भर आहे.

हे वाचलं का?

रेकॉर्ड ब्रेक शनिवार

गदर 2 सिनेमाने दुसऱ्या शनिवारी जितकी कमाई केली आहे, तितकी कमाई मोठ्या-मोठ्या हिंदी सिनेमे करू शकल्या नाही आहेत. बॉलिवूडचा या वर्षातला सर्वात मोठा सिनेमा ‘पठाण’ने दुसऱ्या शनिवारी 22.5 करोडचे कलेक्शन केले होते. तर अनुपम खेर स्टारर ‘द कश्मीर फाईल’ सिनेमाने दुसऱ्या शनिवारी 24.8 करोडची कमाई केली होती. या सर्वांना मागे टाकून ‘बाहूबली 2’ सिनेमाने 26 करोडची कमाई केली होती. मात्र हा बाहुबलीचा रेकॉर्ड देखील गदर 2 ने मोडला आहे. गदर 2 ने दुसऱ्या शनिवारी 32-33 करोडचा व्यवसाय केला.

हे ही वाचा : Nitin Desai : नितीन देसाईंच्या एनडी स्टुडिओबाबत सरकार मोठा निर्णय घेणार,काय म्हणाले उदय सामंत?

गदर 2 सिनेमाने शनिवारच्या कमाईतून ‘वॉर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ सारख्या सिनेमांना मागे टाकले आहे. आजच्या दिवशी रविवारी जर गदर 2 सिनेमाचे कलेक्शन शनिवार इतकं झाले तर सिनेमाच्या कमाईचा आकडा 370 च्या घरात पोहोचणार आहे. ज्यानंतर गदर 2 सिनेमा पठाण आणि दंगल नंतर सर्वाधिक कमाई बॉलिवूडचा तिसरा सिनेमा ठरणार आहे. त्यामुळे सिनेमाच्या कमाईकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT