‘गदर 2’ दोन दिवसात ठरणार सुपरहिट? पहिल्याच दिवशी मोडणार ‘हा’ रेकॉर्ड!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Gadar 2 : ‘गदर 2’ चित्रपटगृहात आज (11 शुक्रवारी) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘गदर’चा सिक्वेल त्याच्याकडून अपेक्षेप्रमाणेच वातावरण निर्माण करत आहे. सनी देओलचा तारा सिंह अवतार पहिल्यांदा 2001 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांनी पाहिला होता. मोठ्या पडद्यावर सनीच्या अ‍ॅक्शनची उत्सुकता ही या चित्रपटातील सर्वात खास गोष्ट आहे. (Gadar 2 will be a superhit in two days This record will be broken on the first day)

ADVERTISEMENT

आता तारा सिंह ‘गदर 2’मध्ये पुन्हा पाकिस्तानात जाताना दिसरणार आहे. यावेळी तो आपल्या मुलासाठी बॉर्डरपलीकडे जाताना दिसेल. 22 वर्षांनंतर येणार्‍या सिक्वलसाठी लोकांमध्ये असलेल्या उत्सुकतेचा पुरावा म्हणजे चित्रपटाचे एडव्हान्स बुकिंग. ‘गदर 2’ बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई करणार आहे. त्याची एडव्हान्स बुकिंग खूपच मजबूत आहे आणि अंदाजानुसार या वर्षातील अनेक मोठे रेकॉर्ड ‘गदर 2’ सोबत रचले जाणार आहेत. ‘गदर 2’ पहिल्या दिवशी किती कमाई करणार आहे आणि त्याच्या नावावर कोणते रेकॉर्ड होणार आहेत. जाणून घेऊयात.

Sedition law : देशद्रोहाचा कायदा संपणार का? मोदी सरकारच्या नव्या कायद्यात काय?

‘गदर 2’ साठी धडाकेबाज अ‍ॅडव्हान्स बुकिंग!

सनी देओलच्या चित्रपटासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग ही लॉकडाऊननंतर बॉलिवूडमधील सर्वात मोठी बुकिंग आहे. याआधी शाहरुख खानच्या ‘पठाण’ला आतापर्यंतचे सर्वात मोठे अॅडव्हान्स बुकिंग मिळाले आहे. शाहरुखच्या या चित्रपटासाठी, नॅशनल चेन्समध्ये 5.5 लाखांहून अधिक तिकिटे अॅडव्हान्स बुकिंग करण्यात आली होती.

हे वाचलं का?

मोठ्या शहरांपासून ते छोट्या शहरांपर्यंत चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद

‘गदर 2’ हा असा चित्रपट आहे जो सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये तगडी कमाई करेल. सनीचा चित्रपट आता काय चमत्कार करतोय हे त्याच्या फाइनल कलेक्शनमधूनच दिसेल. अ‍ॅडव्हान्स बुकिंग ट्रेंड दर्शवते की दिल्ली-मुंबई सारख्या मेट्रो शहरांमध्ये तसेच पाटणा-गोरखपूर-जयपूर सारख्या शहरांमध्ये चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ‘गदर 2’ 22 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येत आहे आणि यात सनीचा अ‍ॅक्शन अवतार दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये वॉक-इन प्रेक्षकही असणार आहेत.

Manipur Violence: ‘मणिपूर जळतंय अन् मोदी हास्य-विनोद…’, राहुल गांधींचा हल्ला

‘गदर 2’चे ओपनिंग कलेक्शन

मिळालेल्या माहितीनुसार, ‘गदर 2’चे कलेक्शन पहिल्या दिवशी सुमारे 33-35 कोटी रुपये होणार आहे. पण सिंगल स्क्रीन्स आणि छोट्या सेंटर्सच्या सपोर्टमुळे चित्रपट अधिक कमाई करू शकतो. त्यामुळे येथून 36-37 कोटींचे कलेक्शन अशक्य नाही. चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन 40 कोटींपर्यंत पोहोचण्याचीही शक्यता आहे. मात्र, सोशल मीडियावर चित्रपटाच्या सुरुवातीच्या प्रतिक्रिया फारशा सकारात्मक नाहीत. यामुळे चित्रपटाच्या स्पीडमध्ये छोटे अडथळे येऊ शकतात.

ADVERTISEMENT

2023 वर्षातील सर्वात मोठी ओपनिंग

पहिल्या दिवशी 57 कोटींची ओपनिंग करून ‘पठाण’ने या वर्षातीलच नव्हे तर बॉलिवूडमधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ओपनिंगचा रेकॉर्ड केला. ‘पठाण’नंतर या वर्षातील दुसरी सर्वात मोठी ओपनिंग ‘आदिपुरुष’च्या नावावर आहे. प्रभासच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 36 कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या क्रमांकावर सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ 15.81 कोटी रुपयांसह आहे.

ADVERTISEMENT

‘गदर 2’ च्या ओपनिंग कलेक्शनच्या अंदाजानुसार, बॉलिवूडसाठी 2023 ची किमान तिसरी सर्वात मोठी ओपनिंग करू शकतो. मात्र प्रेक्षकांनी साथ दिली तर सनीचा चित्रपट ‘आदिपुरुष’लाही मागे टाकू शकतो.

Sana Khan: नागपूरमधील ‘त्या’ भाजप महिला नेत्याची हत्या, आरोपी निघाला…

सनी देओलच्या करिअरमधील ऐतिहासिक कलेक्शन

गदर हे सनीच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात मोठे कलेक्शन आहे. 22 वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 77 कोटींची कमाई केली होती. सनीच्या मागील सर्वात मोठ्या चित्रपटांमध्ये ‘यमला पगला दीवाना’, ‘घायल वन्स अगेन’ आणि ‘अपने’ यांचा समावेश आहे. या सर्व चित्रपटांचे एकूण कलेक्शन 20 ते 55 कोटींच्या दरम्यान आहे. अशा परिस्थितीत अवघ्या दोन दिवसांत ‘गदर 2’ हा सनीच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरणार आहे.

‘गदर 2’चा ओपनिंग वीकेंडही खूप चांगला असेल आणि चित्रपटाला पहिल्या 3 दिवसातच 100 कोटींपर्यंत कमाई करण्याची संधी आहे. त्यामुळे आता ‘गदर 2’ची कथा बॉक्स ऑफिसवर किती दिवसात दमदार कमाई करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT