Aditya Singh Rajput : ‘गंदी बात’ फेम अभिनेत्याचं निधन, ड्रग्सच्या ओव्हरडोसने मृत्यू?
Aditya Singh Rajput Passed Away : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि गंदी बात (Gandi Baat) फेम आदित्य सिंह राजपूत (Aditya Singh Rajput) यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे (Drugs Overdose) त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
ADVERTISEMENT
Aditya Singh Rajput Passed Away : प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता हिच्या अपघाती मृत्यूची घटना ताजी असतानाच आता बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि गंदी बात (Gandi Baat) फेम आदित्य सिंह राजपूत (Aditya Singh Rajput) यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.राहत्या घरीच आदित्यचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत बाथरूमध्ये सापडला होता. ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे (Drugs Overdose) त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. या घटनेने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. तसेच अनेक अभिनेत्यांनी आदित्यला श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे. (gandi baat actor aditya singh rajput found dead in bathroom after alleged drug overdose)
ADVERTISEMENT
प्रसिद्ध अभिनेता, मॉडल, कास्टींग डायरेक्टर आदित्य सिंह राजपूत (Aditya Singh Rajput) याचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याची घटना घडलीय.आज दुपारी ही घटना उघडकीस आली आहे. आदित्य यांचा मृतदेह अंधेरीतील त्यांच्या राहत्या घरातील बाथरूममध्ये संशयास्पदरित्या अवस्थेत आढळून आला होता. आदित्यचे मित्र आज त्याच्या घरी पोहोचले होते. यावेळी घरातील बाथरूममध्ये त्याचा मृतदेश संशयास्पदरीत्या आढळून आला होता.यावेळी आदित्यच्या मित्रानी वॉचमनसह मिळून आदित्यला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. या घटनेने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा : दुसऱ्याचा जीव वाचवायला गेली अन्.. 29 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
कोण आहे अभिनेता?
मुळचा दिल्लीचा असलेला आदित्य सिंह राजपूतने त्याच्या करीअरची सुरुवात मॉडेलच्या रुपात केली होती. आदित्यचे मॉडेलिंगचे करिअर खुप चांगले राहिले होते. तसेच अनेक टीव्ही शोज आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर त्याने ब्रॅंड पॉप कल्चर सुरु केले होते. या ब्रॅंड पॉप कल्चर अतर्गत तो कास्टींग डायरेक्टरचे काम करायचा. त्याने इंडस्ट्रीत अनेक अभिनेते-अभिनेत्रींना इंडस्ट्रीत लॉंच केले होते.
हे वाचलं का?
‘या’ सिनेमात अभिनय केला?
आदित्य सिंह राजपूतने याने ”क्रांतिवीर” आणि ”मैंने गांधी को नहीं मारा” या सिनेमात केले होते. याव्यतिरीक्त अनेक टीव्ही मालिका आणि शोजमध्ये काम केले होते. यासह 300 हून अधिक जाहिरातीत देखील आदित्य राजपूत दिसले होते. प्रसिद्द रिअॅलिटी स्प्लिट्सविला या शोचा देखील तो एक भाग होता.तसेच त्यांने गंदी बात मालिकेत देखील काम केले आहे.
हे ही वाचा : कधी चोर.. कधी वेटरची भूमिका साकरणारा नवाजुद्दीन सिद्दीकी आज घेतो कोट्यवधी रुपये, पण नेहमी अडकतो वादात
दरम्यान आदित्य सिंह राजपूतच्या अचानक निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. तसेच आता ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र यात किती तथ्य आहे, हे पोलिस तपासात समोर येणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT