कबड्डीपटूशी लग्न ते कॅन्सरने निधन… इमोशनल आहे ACP प्रद्युम्न यांची Love Story

मुंबई तक

कुछ तो गड़बड़ है दया…! हे वाक्य ऐकल्यावर 90’s पिढीपुढे एकच चेहरा येतो तो ACP प्रद्युम्न यांचा. ACP प्रद्युम्न, अभिजीत आणि दया या पात्रांनी CID च्या माध्यमातून 2 पिढ्यांचं मनोरंजन केलं. ACP प्रद्युम्न अर्थात शिवाजी साटम यांनी तर आपल्या आयुष्यातील 21 वर्षे CID या शोसाठी दिली.

ADVERTISEMENT

Shivaji Satam And Aruna Satam love story
Shivaji Satam And Aruna Satam love story
google news

कुछ तो गड़बड़ है दया…! हे वाक्य ऐकल्यावर 90’s पिढीपुढे एकच चेहरा येतो तो ACP प्रद्युम्न यांचा. ACP प्रद्युम्न, अभिजीत आणि दया या पात्रांनी CID च्या माध्यमातून 2 पिढ्यांचं मनोरंजन केलं. ACP प्रद्युम्न अर्थात शिवाजी साटम यांनी तर आपल्या आयुष्यातील 21 वर्षे या शोसाठी दिली. एक कडक स्वभावाचा अधिकारी म्हणून त्यांनी या मालिकेच्या माध्यमातून ओळख मिळवली होती. एसीपी प्रद्युम्न शिवाय त्यांनी इतरही अनेक भूमिका केल्या, पण हीच भूमिका त्यांच्या आयुष्याची ओळख बनली होती. (ACP Pradyumna, Abhijeet and Daya entertained 2 generations through CID)

पण टीव्हीवर कडक स्वभावाचा वाटणारे CID ऑफिसर खऱ्या आयुष्यात खूप मृदुभाषी होते, हे अनेकांना सांगून पटणार नाही. पण हे खरं आहे. शिवाजी साटम यांचं आयुष्य, त्यांची प्रेमकहाणी या सगळ्या गोष्टी सर्वांनाच प्रेरणा देणाऱ्या आहेत. शिवाजी साटम आज त्यांचा ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बॉलिवूडवर शोककळा! यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचे निधन

पत्नी कबड्डी चॅम्पियन होती :

शिवाजी साटम यांच्या पत्नी अरुणा साटम यांचे निधन होऊन 23 वर्षे झाली, पण आजही त्यांना त्यांची खूप आठवण येते. या दोघांची प्रेमकहाणी खूप वेगळी होती. त्यांची जोडी पाहून अनेकांना वाटायचं की दोघांनी लव्ह मॅरेज केले असावे. पण तसं नव्हतं, त्यांनी अरेंज मॅरेज केलं होतं आणि हे लग्न त्यांच्या वडिलांनी ठरवलं होतं. 70 च्या दशकाच्या तुलनेत विचार केला तर शिवाजी साटम यांच्या पत्नी अत्यंत पुढारलेली विचारसरणीच्या होत्या.

हे लग्न कसं जुळलं हे खुद्द शिवाजी साटम यांनीच सांगितलं आहे. ते म्हणाले – माझे वडील कुस्तीपटू होते, ते कुटुंबाचे प्रमुख होते. ते रोज आखाड्यात जायचे. माझा मोठा चुलत भाऊ एक पुरस्कार विजेता खेळाडू होता. माझे वडील पुरोगामी विचार करणारे होते. ते स्वतः माझ्या बहिणीला आखाड्यात घेऊन जायचे. त्यांच्याकडे जुनी आणि रूढीवादी विचारसरणी कधीच नव्हती.

हे वाचलं का?