अमिताभ यांचा हटके मास्क तुम्ही पाहिलात का??

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. अनेक गोष्टी बिग बी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर करतात. तर नुकतंच अमिताभ यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक व्हिडीयो शेअर केला होता. यावेळी या व्हिडीयोपेक्षा त्यांनी घातलेल्या मास्कची चर्चा अधिक झाली.

ADVERTISEMENT

अमिताभ यांनी शेअर केलेल्या या व्हिडीयोमध्ये अमिताभ यांनी हटके असा मास्क घातला होता. या मास्कवर हिरव्या रंगाची लाईट असते. हा मास्क घातल्यावर बोलल्यानंतर ओठांच्या आकारानुसार या लाईटचा शेप बदलतो. हा मास्क घालून त्यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

तर चाहत्यांना अमिताभ यांचा हा मास्क फारच आवडलाय. अनेकांनी त्यांच्या या व्हिडियोवर मजेदार कमेंट्स देखील केल्या आहेत. सध्या अमिताभ यांचा हा हटके मास्क जोरदार चर्चेत आहे.

हे वाचलं का?

दरम्यान अमिताभ बच्चन लवकरच इम्रान हाश्मीसोबत चेहरे या सिनेमात दिसणार आहेत. त्याचप्रमाणे नागाराज मंजुळेच्या झुंड आणि अयान मुखर्जी यांच्या ब्रम्हास्त्र सिनेमातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ब्रम्हास्त्र सिनेमात त्यांच्यासोबत आलिया भट, रणबीर कपूर, नागार्जुन तसंच मौनी रॉय देखील झळकणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT