कंगनामुळे हृतिक पुन्हा एकदा अडचणीत
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला अभिनेत्री कंगना रणौत प्रकरणादरम्यान समन्स बजावण्यात आला आहे. सीआययुतर्फे म्हणजेच गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकातर्फे हा समन्स बजावण्यात आलाय. यानुसार येत्या हृतिकला 27 फेब्रुवारी रोजी म्हणजेच उद्या जबाब नोंदवण्यासाठी हजर रहावं लागणार आहे. कंगना आणि हृतिक यांच्यात झालेल्या ईमेल्सच्या वादावरून हृतिकची चौकशी केली जाणार आहे. 2016 साली हृतिककडून तक्रार दाखल करण्यात आली होती […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला अभिनेत्री कंगना रणौत प्रकरणादरम्यान समन्स बजावण्यात आला आहे. सीआययुतर्फे म्हणजेच गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकातर्फे हा समन्स बजावण्यात आलाय. यानुसार येत्या हृतिकला 27 फेब्रुवारी रोजी म्हणजेच उद्या जबाब नोंदवण्यासाठी हजर रहावं लागणार आहे. कंगना आणि हृतिक यांच्यात झालेल्या ईमेल्सच्या वादावरून हृतिकची चौकशी केली जाणार आहे.
2016 साली हृतिककडून तक्रार दाखल करण्यात आली होती ज्यामध्ये, त्याच्या नावाने फेक आयडी तयार करून कंगनाशी संवाद साधला असल्याचं म्हटलं होतं. तर दुसरीकडे कंगनाने हृतिक आपल्याला सतत इमेल पाठवून त्रास देत असल्याचा आरोप केला होता. यावर हृतिकने आपण कंगनाला कोणतेही इमेल पाठवले नसल्याचा खुलासाही केला होता.