हृता दुर्गुळे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर,या मालिकेतून करणार नवीन सुरवात
आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने तमाम प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली आहे. ती अक्षरशः तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. फुलपाखरू नंतर हृताचे चाहते तिच्या नवीन मालिकेची अत्यंत आतुरतेने वाट बघत होते. झी मराठीवर नुकताच एका मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि प्रेक्षक चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि […]
ADVERTISEMENT
आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने तमाम प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली आहे. ती अक्षरशः तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. फुलपाखरू नंतर हृताचे चाहते तिच्या नवीन मालिकेची अत्यंत आतुरतेने वाट बघत होते. झी मराठीवर नुकताच एका मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि प्रेक्षक चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.मन उडू उडू झालं असं या मालिकेचं नाव असून ही मालिका ३० ऑगस्ट पासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. हृताने या मालिकेचा टिझर आणि प्रोमो शेअर करत चाहत्यानांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना ‘कमिंग बॅक होम वाली फिलिंग’ असं म्हंटल. पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मालिका करताना हृताचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. प्रोमो पाहून प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हृता या मालिकेत एक वेगळ्या लुकमध्ये दिसतेय. तिचा प्रोमोमधील लुक पाहून फक्त मालिकेतला नायकच नाही तर तमाम महाराष्ट्राचं घायाळ झाला आहे यात शंकाच नाही.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT