शूटींग करायचे असेल तर हे नियम पाळावेच लागणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निर्मात्यांच्या बैठकीत दिले सक्त आदेश
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. बॉलिवूड तसंच मराठी कलाकार देखील कोरोनाच्या विळख्यात अडकलेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट आणि टिव्ही मालिका निर्माते यांच्याशी व्हिडीयो कॉलिंगद्वारे चर्चा केली. यामध्ये सरकार घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने यापुढे शूटींग करायचे असेल तर काही कडक नियम पाळावे लागतील तरच शूटींगला परवानगी […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. बॉलिवूड तसंच मराठी कलाकार देखील कोरोनाच्या विळख्यात अडकलेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट आणि टिव्ही मालिका निर्माते यांच्याशी व्हिडीयो कॉलिंगद्वारे चर्चा केली. यामध्ये सरकार घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने यापुढे शूटींग करायचे असेल तर काही कडक नियम पाळावे लागतील तरच शूटींगला परवानगी देऊ असे सक्त आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी व्हिडिओ कॉलिंगमध्ये असलेल्या सर्व निर्माते, सिनेसंघटनांचे पदाधिकारी आणि कलाकारांना दिले आहेत. शूटींगस्थळी सरकारने घालून दिलेले नियम जर पाळत नसल्यास आणि तसे निर्दशनास आल्यास तात्काळ ते शूटींग थांबवण्यात येईल असा इशाराही या बैठकीत निर्मात्यांना देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
सरकारने शूटींगदरम्यान कोणते प्रमुख नियम लावले आहेत त्यावर एक नजर टाकूया
हे वाचलं का?
– शूटींग सुरु ठेवता येईल मात्र गर्दीचा समावेश असलेली शूटींग करू नयेत
– सेटवरील सर्व कर्मचारी व सेटवरील सर्व लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
ADVERTISEMENT
– सेटवर मालिका, सिनेमातील प्रमुख कलाकार असतील त्यांच्यासोबतच जास्तीत जास्त शूटींग करण्यात यावेत
ADVERTISEMENT
– युध्द, डान्स, गर्दीची स्थळं दाखवणारं कोणत्याही शूटींगला परवानगी नाही
– ४५ वर्षांवरील सर्वांनी तातडीने लस घेणे बंधनकारक
– कंटेन्मेंट झोन घोषित झालेल्या परिसरातील कोणालाही शूटींगच्या ठिकाणी यायला परवानगी नाही
– जोपर्यंत कंटेन्मेंट झोन त्या भागातला उठवला जात नाही तोपर्यंत त्याभागात राहणारा कोणताही व्यक्ती शूटींगला हजर राहू शकत नाही.
– सेटवर सतत मास्क घालणे बंधनकारक, सँनीटायझेशन करणे बंधनकारक
– सेटवरील ज्या भागात एखादा सीन शूट करायचा असल्यास शूट करण्यापूर्वी तो भाग पूर्णपणे सँनीटायझ करणे बंधनकारक
– कलाकारांनी शूटींगस्थळी सीनचा टेक ओके झाल्यावर तात्काळ मास्क घालणे बंधनकारक
– शूटींगला आल्यावर गेटवरच शरीराचं तापमान चेक करणे बंधनकारक
– शूटींगस्थळी एखाद्या व्यक्तीला ताप किंवा काही लक्षणं आढळल्यास तातडीने त्याला कोरोना टेस्ट करणे बंधनकारक
सरकारने जाहीर केलेल्या निर्बंधानुसार शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ पर्यंत कडक लॉकडाऊन असल्याने त्यादिवसात कोणतंही शूटींग होणार नाही. त्यामुळे येत्या ५ दिवसांत दिलेल्या नियमांनुसार निर्मात्यांनी आपली शूटींग पूर्ण करायची आहेत. तसंच या नियमांचं पालन होतं की नाही यासाठी सरकारतर्फे काही भरारी पथकांचीही नियुक्ती केलेली आहे. त्याप्रमाणे या भरारी पथकाला एखाद्या शूटींगस्थळी वर दिल्याप्रमाणे नियम पाळले जात नसतील असं आढळलं तर तातडीने ते शूटींग तिथल्या तिथे थांबवून रद्द करण्यात येईल असे सक्तीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी झालेल्या बैठकीत या सर्व निर्मात्यांना दिले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT