माझ्या बोलीभाषेत आज भूमिका करताना आनंद होतो आहे – विजय कदम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना सध्या एकच प्रश्न सतावतोय ती परत आलीये म्हणजे ती नक्की कोण? या मालिकेचे उत्कंठावर्धक प्रोमोज पहिल्यापासून प्रेक्षक मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत . या मालिकेत अभिनेता विजय कदम एका प्रमुख भीमकेत दिसणार आहेत. हि मालिका, त्यांची व्यक्तिरेखेविषयी आणि टेलिव्हिजनवर त्यांच्या पुनरागमनाबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले, “मी साकारत असलेली बाबूराव तांडेल ही भूमिका अत्यंत वेगळी आणि चौकटीच्या बाहेर जाऊन सादर होणारी असल्याने माझ्यासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण विजय कदम हा विजय कदम न वाटता तो वेगळा वाटायला हवा. त्या पात्रातून तो पोहोचायला हवा. साडेचार महिन्यांपूर्वी नीलेश मयेकरांनी या मालिकेविषयी मला विचारले आणि मी तातडीने होकार कळवला. जी बोलीभाषा मी लहानपणापासून बोलत आलोय, ऐकत आलोय त्याच बोलीभाषेत आज भूमिका करताना आनंद होतो आहे. सर्वसाधारण कोकणातील माणूस, स्पष्टवक्ता, आजचा दिवस आनंदाने जगणारा असा हा बाबूराव आहे. तो धाडसी असल्याचे लोकांना वारंवार भासवत असतो, पण पायाखालून उंदीर गेला तरी तो घाबरतो. बरे याचे उत्तरही त्याच्याकडे तयार असते. असे गमतीशीर हे पात्र आहे. मी सस्पेन्स थ्रिलर खूप पाहिले आहेत आणि शैलीमध्ये काम करण्याची माझी इच्छा होती जी या मालिकेमुळे पूर्ण झाली आहे. या मालिकेत मला एका उत्तम भूमिका साकारायला मिळतेय, या कथानकाचा सूत्रधार मी असल्यामुळे मला काम करताना खूप मजा येतेय.”ती परत आलीये म्हणजे ती नक्की कोण आहे याबद्दल सांगताना ते म्हणाले, “ती कोण आहे हे मला माहिती पण तिच्या येण्याचा प्रवास खूप दूरवरचा आहे. त्यामुळे सध्या तिच्या भोवती गूढ वलय रंगवण्यात आम्ही सगळे कलाकार रमलो आहोत. त्यामुळे ती कोण आहे हे प्रेक्षकांना मालिकेसोबत उलगडत जाईल.”

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT