कपिल शर्माच्या घरी पुन्हा हलला पाळणा
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी गिन्नीने 1 फेब्रुवारी ला सकाळी मुलाला जन्म दिला. स्वत: कपिल शर्माने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसह शेअर केली. कपिलने ट्विट केले की आपल्या घरी एक छोटासा पाहुणा आला आहे. कपिलच्या ट्विटनंतर अनेकांनी त्याचे अभिनंदन करण्यास सुरवात केली आहे. सकाळी साडेपाच वाजता ट्विट […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी गिन्नीने 1 फेब्रुवारी ला सकाळी मुलाला जन्म दिला. स्वत: कपिल शर्माने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसह शेअर केली. कपिलने ट्विट केले की आपल्या घरी एक छोटासा पाहुणा आला आहे. कपिलच्या ट्विटनंतर अनेकांनी त्याचे अभिनंदन करण्यास सुरवात केली आहे. सकाळी साडेपाच वाजता ट्विट करत कपिल शर्माने सर्वांसमोर ही चांगली बातमी शेअर केली. कपिल आणि गिन्नी यांना यापूर्वी एक मुलगी अनिरा आहे. ती गेल्या डिसेंबरमध्येच ती १ वर्षांची झाली आहे.
हे वाचलं का?
कपिल शर्मा यांनी ट्विटरवरुन आनंदी बातमी शेअर करताना लिहिले की, ‘नमस्कार, आज सकाळी देवाकडून आशीर्वाद मिळाल्यामुळे आम्हाला एक मुलगा झाला आहे. देवाच्या कृपेने बाळ आणि आई दोघेही निरोगी आहेत आपल्या सर्व प्रार्थना आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.कपिल शर्माच्या या ट्विटनंतर बरेच लोक त्यांचे अभिनंदन करत आहेत. कपिल शर्माने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की त्याची पत्नी गरोदर आहे. चाहत्यांशी थेट लाइव्ह चॅटमध्ये कपिल शर्माने याचा खुलासा केला होता. कपिल आणि गिन्नीचे २०१८ मध्ये लग्न झाले होते, त्यानंतर जुलैमध्ये गिन्नी प्रेंग्नेंट झाल्याची बातमी समोर आली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT