‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार 'ही' ज्येष्ठ अभिनेत्री
Kon honaar crorepati : ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेत्री माधुरी दीक्षित करणार आहेत. माधुरी दीक्षित यांच्या आगमनामुळे कार्यक्रमात नवा दृष्टीकोन आणि नवी ऊर्जा पाहायला मिळणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार 'ही' ज्येष्ठ अभिनेत्री
नव्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेत्री माधुरी दीक्षित करणार आहेत
Kon honaar crorepati : मराठी मनोरंजनविश्वात ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची सुरुवात होणार असून या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेत्री माधुरी दीक्षित करणार आहेत. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV यांनी या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्राची लाडकी लेक आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या आगमनामुळे कार्यक्रमात नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. नव्या विचारांचा, नव्या ऊर्जेचा आणि नव्या स्वप्नांचा प्रवास या पर्वातून सुरू होणार असून ‘आता खेळ बदलणार’ अशी घोषणा करण्यात आली आहे.
हेही वाचा : हा ग्राऊंड रिपोर्ट डोळे उघडून बघायलाच हवा, इन्फ्रामॅन कुठे आहेत?
माधुरी दीक्षित सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार
महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेल्या या प्रतिष्ठित मंचावर माधुरी दीक्षित सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आता आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत त्या ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची सूत्रं हाती घेणार आहेत. ज्ञानाच्या बळावर स्वप्नांना नवी दिशा देणारा आणि सामान्य माणसाच्या असामान्य प्रवासाला व्यासपीठ देणारा हा कार्यक्रम यंदाही प्रेरणादायी ठरणार अशी आशा सर्वांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा : ठाकरे पुन्हा कोर्टात, सिब्बलांच्या नव्या युक्तिवादाने फुटीर खासदारांवर गंडांतर?
