सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी बाजीप्रभू साकारण्यासाठी केसांना लावली कात्री

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्टार प्रवाहवर २६ जुलैपासून भेटीला येणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. छत्रपती शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या शिलेदारांनी प्राणांची आहुती दिली त्या शिलेदारांच्या शौर्याला ही मालिका समर्पित आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव या मालिकेत बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत असून ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्य़ासाठी त्यांनी केसांना कात्री लावली आहे.

अभिनयाच्या आजवरच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मी केसांना कात्री लावल्याचं अजिंक्य देव म्हणाले. एक अभिनेता म्हणून हा निर्णय घेणं माझ्यासाठी थोडं कठीण होतं. प्रेक्षकांना हा लूक आवडेल का याची भीती देखील होती. मात्र माझ्या या नव्या लूकला प्रेक्षकांनी पसंती दिलेली पाहून माझा निर्णय योग्य असल्याचं समाधान आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इतिहासावरच्या प्रेमापोटीच हे शक्य झालं आहे. बाजीप्रभू देशपांडेंसारखं भव्यदिव्य व्यक्तिमत्व साकारायचं तर एवढा त्याग करणं गरजेचं होतं असं मला वाटतं अशी भावना अभिनेते अजिंक्य देव यांनी व्यक्त केली. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची आहे. २६ जुलैपासून रात्री १० वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट भेटीला येणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT