मराठी पाऊल पडते पुढे.. शशांक केतकरच्या मालिकेचं शूटिंग थेट लंडनमध्ये!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

marathi actor shashank ketkar is shooting for a tv serial from london
marathi actor shashank ketkar is shooting for a tv serial from london
social share
google news

Shashank Ketkar London: मुंबई: मराठी मनोरंजन क्षेत्रात आता ग्लोबल होऊ लागलं आहे. त्यातही छोट्या पडद्यावरील मालिका क्षेत्र हे अधिक रुंदावत चाललं आहे. कारण की, आता थेट सातासमुद्रापार मराठी मालिकेचं शूटिंग होत असल्याचं समोर आलं. मागील काह वर्षात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. ज्याचा फायदा आता छोट्या पडद्यावरील मालिकांना देखील होत आहे. याचंच उत्तम उदाहरण हे सुप्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) याच्याबाबत पाहायला मिळालं आहे. (marathi actor shashank ketkar is shooting for a tv serial from london)

ADVERTISEMENT

मुरांबा ही स्टार प्रवाहवरील मालिकेतील सध्या बरीच चर्चेत आहे. त्यातच रमा आणि अक्षयच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेमही मिळतं आहे. अभिनेता शशांक केतकर हा सध्या लंडनमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत असल्यामुळे मालिकेच्या कथानकात तो कामानिमित्ताने बाहेरगावी गेल्याचं दाखवण्यात आलं आहे.

शशांक केतकर कसा करतोय लंडनमधून शूटिंग?

पण फोनच्या माध्यमातून तो रमाच्या आणि कुटुंबीयांच्या सतत संपर्कात असतो. फोनवरील संभाषणाचे हे सीन शशांक स्वत: त्याच्या मोबाइलवर शूट करतोय आणि तेही लंडनमधून. या सीन्सच्या निमित्ताने प्रेक्षकांनाही लंडनच्या नयनरम्य ठिकाणांचं दर्शन होत आहे. याआधीही शशांकने मुरांबा मालिकेसाठी असे सीन शूट केले होते.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> NCP खासदार अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर?,. हाती ‘द न्यू BJP’ पुस्तक; म्हणाले…

परदेशातील शूटिंगच्या अनुभवाविषयी सांगताना शशांक म्हणाला, ‘मला झोकून देऊन काम करायला आवडतं. प्रोजेक्ट कुठलंही असो मी माझे शंभर टक्के देतो. जेव्हा स्टार प्रवाहसारखी वाहिनी, पॅनोरमा सारखं प्रोडक्शन हाऊस, सहकलाकार आणि पडद्यामागची संपूर्ण टीम जेव्हा मला माझ्या नव्या प्रोजेक्टसाठी सहकार्य करतात तेव्हा माझीही जबाबदारी असते की मी देखील माझ्या टीमला संपूर्ण सहकार्य करायला हवं. त्यामुळेच मुरांबा मालिकेचे काही सीन्स मी परदेशातून माझ्या मोबाइलवरुनच शूट करायचं ठरवलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर आजही कमाईत सुपरहिट! इतकं आहे नेटवर्थ…

‘खरं तर अनेक मालिकांचं बरचसं शूटिंग मुंबईमध्ये होतं. त्यामुळेच जर परदेशातलं लोकेशन पाहायला मिळालं तर नेहमी मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी असते. त्यामुळेच प्रेक्षकांसाठी मी मुरांबा मालिकेसाठी काही सीन्स शूट करुन पाठवतोय. मी मायदेशी लवकरच परतणार आहे.’ असंही शशांक केतकर यावेळी म्हणाला.

दरम्यान, शशांकच्या या नव्या शूटिंग लोकेशनमुळे प्रेक्षकांना देखील छोट्या पडद्यावर लंडन पाहता येणार आहे. यामुळे मालिकेत देखील काहीसं नावीन असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT