रंगीबेरंगी साड्यांमध्ये खुललं ‘काहे दिया फेम’…गौरीचं सौंदर्य
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असणाऱ्या मराठी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सायली संजीव सायलीने नुकतचं इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध प्रकारच्या साड्यांमध्ये आपलं खास फोटोशूट फॅन्ससाठी शेअर केलं आहे. फिकट निळ्या रंगाची साडी, मोकळे केस अशा स्टाईलिश अंदाजात सायलीचं सौंदर्य खुलून आलंय. यानिमीत्ताने सायलीच्या आतापर्यंतच्या करिअरची आपण थोडक्यात ओळख करुन घेणार आहोत. सायली संजीवचा जन्म १९९३ साली […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असणाऱ्या मराठी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सायली संजीव
हे वाचलं का?
सायलीने नुकतचं इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध प्रकारच्या साड्यांमध्ये आपलं खास फोटोशूट फॅन्ससाठी शेअर केलं आहे.
ADVERTISEMENT
फिकट निळ्या रंगाची साडी, मोकळे केस अशा स्टाईलिश अंदाजात सायलीचं सौंदर्य खुलून आलंय.
ADVERTISEMENT
यानिमीत्ताने सायलीच्या आतापर्यंतच्या करिअरची आपण थोडक्यात ओळख करुन घेणार आहोत.
सायली संजीवचा जन्म १९९३ साली झाला असून ती मुळची धुळ्याची आहे.
सायलीचं संपूर्ण शालेय आणि पदवीचं शिक्षण नाशिकमध्ये झालंय. अभिनय क्षेत्राची आवड असलेल्या सायलीने अनेक सिरीअर, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.
हिरव्या साडीतल्या तिच्या या लूकवरही चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.
अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेल्या मेकअपमध्येही सायलीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलं आहे.
झी मराठी वाहिनीवर काहे दिया परदेस ही सायलीची पहिली गाजलेली मालिका
या मालिकेत सायलीने साकारलेलं गौरी हे पात्र चांगलंच गाजलं होतं. अभिनेता ऋषी सक्सेना आणि सायलीची जोडी राज्यभरात चांगली गाजली होती.
आतापर्यंत सायलीने काहे दिया परदेस, परफेक्ट पती, गुलमोहर, शुभमंगल ऑनलाईन या मालिकांमध्ये काम केलं आहे.ए
याव्यतिरीक्त पोलीस लाईन, आटपाडी नाईट्स, एबी आणि सीडी, सातारचा सलमान या चित्रपटांमध्येही सायलीने भूमिका साकारली आहे.
बस्ता हा सायलीचा थिएटरमध्ये आलेला शेवटचा मराठी चित्रपट होता.
यानंतर झिम्मा हा सायलीचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी लवकरच येणार आहे.
काय मग तुम्हाला कसा वाटला विविध रंगीबेरंगी साड्यांमध्ये सायलीचा हा स्टाईलीश अंदाज?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT