Seema haider : सीमावर चित्रपट बनवणाऱ्या अमित जानीला मनसेने का दिलीये धमकी?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

movie on Seema Haider : Maharashtra Navnirman Sena. MNS leader Amay Khopkar threatened Amit Jani.
movie on Seema Haider : Maharashtra Navnirman Sena. MNS leader Amay Khopkar threatened Amit Jani.
social share
google news

seama Haider and sachin love story film : सीमा हैदर कोण, हे आज कुणाला सांगण्याची गरज नाही. गेल्या महिनाभरापासून तिची इतकी प्रसिद्धी झालीये. सीमा हैदर आजही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता सीमा हैदर आणि सचिनच्या लव्हस्टोरीवर चित्रपटही येणार आहे. पण हा चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्याला धमकी देण्यात आलीये. मनसेबरोबर आणखी एका पक्षाने ही धमकी दिलीये.

सीमा आणि सचिनच्या कथेवर ‘कराची टू नोएडा’ हा चित्रपट बनत आहे. जानी फायरफॉक्स प्रॉडक्शन हाऊसचे अमित जानी हा चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटात सीमा हैदरची भूमिका मॉडेल आणि अभिनेत्री फरहीन फलक ही साकारणार आहे.

सपा नेत्याची पहिली धमकी

सीमा हैदर ही गुप्तहेर असल्याचेही म्हटले गेले आहे सध्या तिची उत्तर प्रदेश एटीएसकडून चौकशी सुरू असून, तिच्यावर चित्रपट बनवण्यास विरोध होत आहे. कराची टू नोएडा असा चित्रपट बनवणाऱ्या अमित जानी यांना आधी उत्तर प्रदेशातील सपाचे नेते अभिषेक सोम आणि नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चित्रपट धमकी दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रसिद्ध ‘लव्हस्टोरी’वर ‘कराची ते नोएडा’

अमित जानी यांनी सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रसिद्ध ‘लव्हस्टोरी’वर ‘कराची टू नोएडा’ या नावाने चित्रपट बनवण्याची घोषणा केली. या संदर्भात अमित जानीने सीमा आणि सचिनला चित्रपटाची ऑफरही दिली होती, तेव्हापासून अमित जानीला धमक्या येण्यास सुरूवात झाली.

मनसेने काय दिलीये धमकी?

सपा नेते अभिषेक सोम यांनी अमितला धमकी दिली. त्यानंतर आता अमित जानी यांना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने इशारा दिला. मनसे नेते अमेय खोपकर यांनी अमित जानी यांना ट्विट करून धमकी दिली आहे.

ADVERTISEMENT

वाचा >> कोण आहे फरहीन फलक, जी ‘कराची टू नोएडा’ चित्रपटात दिसणार सीमा हैदरच्या भूमिकेत?

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या.”

ADVERTISEMENT

“आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच”, असं खोपकर यांनी म्हटलं आहे.

वाचा >> शरद पवार-अजित पवारांची भेट भाजपसोबत जाण्यासाठी नाही, तर…; कारण आलं समोर

मुंबई ते कराची तिकीट कन्फर्म

पाकिस्तानहून आलेल्या सीमा हैदरचे मुंबई ते कराची तिकीट कन्फर्म झाले आहे. त्यामुळे सीमा हैदर खरोखरच पाकिस्तानाला जाणार का, अशी चर्चा सुरू झालीये. 31 डिसेंबर 2023 रोजीचे आहे, हे तिकीट फक्त सीमा हैदर आणि अमित जानी या दोघांचेच बुक केले आहे, सीमाच्या चार मुलांसाठी नाही. दुसरीकडे मेरठमधील समाजवादी पक्षाचे नेते अभिषेक सोम यांनी सीमा हैदरवर चित्रपट बनवण्यास विरोध दर्शवला आहे. त्यात आता मनसेनेही इशारा दिला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT