Nitin Desai : आलिशान शब्दही फिका, असा आहे देसाईंचा एनडी स्टुडिओ, Inside photos

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Nitin Desai's ND Studio has also been a favorite destination for tourists. ND Studio remains a special destination among people coming to Mumbai from different cities.
Nitin Desai's ND Studio has also been a favorite destination for tourists. ND Studio remains a special destination among people coming to Mumbai from different cities.
social share
google news

Nitin Desai Latest News : ज्यांच्या कलेवर असंख्य लोकांनी भरभरून प्रेम केलं, ते प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आता आपल्यात नाहीत. 2 ऑगस्ट रोजी पहाटे 4.30 वाजता त्यांनी एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. आर्थिक चणचण निर्माण झाल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे सांगितलं जात आहे. ज्या प्रसिद्ध एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली, रायगड जिल्ह्यातील कर्जत रोड, खालापूर येथे आहे. (Nitin Desai committed suicide at ND Studio, The famous ND studio in which he died is on Kajarat Road, Khalapur in Maharashtra)

ADVERTISEMENT

एनडी स्टुडिओमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांचे सेट

नितीन देसाई यांनी आपल्या मेहनतीने 2005 मध्ये 52 एकरांवर एनडी स्टुडिओची उभा केला होता. देसाईंच्या संकल्पनेतूनच हा भव्य दिव्य स्टुडिओ साकारला गेला. एनडी स्टुडिओमध्ये इनडोअर आणि आउटडोअर शूटिंग पर्याय आहेत. 2008 मध्ये यूएस-आधारित फिल्म स्टुडिओ 20th Century Fox ने ND स्टुडिओमध्ये चार मजले भाड्याने देण्यासाठी 10 वर्षांचा करार केला होता. पौराणिक कार्यक्रमांचे भव्य सेट येथे पाहायला मिळतात.

त्यांच्या स्टुडिओमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांचे आणि टीव्ही शोचे सेट लावण्यात आले होते. बिग बॉस हा रिअॅलिटी शोचा सेटही एनडी स्टुडिओमध्येच तयार केला गेला होता. अनेक चित्रपट आणि टीव्ही शोचे शूटिंग येथे झाले आहे. यामध्ये ‘किक’, ‘जोधा अकबर’, ‘स्लमडॉग मिलेनियर’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘चक्रवर्ती सम्राट अशोक’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘ताजमहल’, ‘प्यार की ये एक कहानी’ यांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

हा स्टुडिओ आहे नजरेत भरणारा, पहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by ND’s Film World (@ndsfilmworld)

वाचा >> Nitin Desai Suicide: …म्हणून नितीन देसाईंनी केली आत्महत्या?

 

View this post on Instagram

 

A post shared by ND’s Film World (@ndsfilmworld)

ADVERTISEMENT

वाचा >> Nitin Desai : खिडकीतून बघितलं अन् बॉडीगार्ड हादरला; एनडी स्टुडिओत काय घडलं?

 

View this post on Instagram

 

A post shared by ND’s Film World (@ndsfilmworld)

ADVERTISEMENT

वाचा >> RPF Constable : “मनोरुग्ण निवडून माणसं मारतो का?”, जितेंद्र आव्हाडांचा चढला पारा

 

View this post on Instagram

 

A post shared by ND’s Film World (@ndsfilmworld)

एनडी स्टुडिओ आहे पर्यटन स्थळ

गेल्या काही वर्षांपासून एनडी स्टुडिओ हे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले. वेगवेगळ्या शहरांतून मुंबईत येणाऱ्या लोकांमध्ये एनडी स्टुडिओ हे एक खास ठिकाण आहे. इथे आल्यावर लोकांना आपण एका वेगळ्याच विश्वात प्रवेश केल्याचा भास होतो. भव्य सेट लोकेशन्स पाहणे त्याच्यासाठी ट्रीटपेक्षा कमी नाही. हा स्टुडिओ मुंबईपासून 90 मिनिटांच्या अंतरावर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ND’s Film World (@ndsfilmworld)

 

View this post on Instagram

 

A post shared by ND’s Film World (@ndsfilmworld)

 

View this post on Instagram

 

A post shared by ND’s Film World (@ndsfilmworld)

नितीन देसाई यांना 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार

नितीन देसाई यांच्या निधनामुळे चित्रपट आणि टीव्ही विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जवळची माणसं पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. नितीन देसाईंनी आपल्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ND’s Film World (@ndsfilmworld)

अनेक वर्षे प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम केल्यानंतर नितीन देसाईंनी 2002 मध्ये चित्रपट निर्मितीमध्ये हात आजमावला. त्यांनी ‘कच्छची देवी माता’ या धार्मिक चित्रपटाची निर्मिती केली. नितीन देसाईंना त्याच्या उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी 4 वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT