Prathemesh-Mugdha Engagement : प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनने गुपचूप उरकला साखरपुडा ?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

prathmesh laghate and mugdha vaishampayan engagement share post on social media saregamapa littele champ
prathmesh laghate and mugdha vaishampayan engagement share post on social media saregamapa littele champ
social share
google news

Prathemesh Laghate Mugdha Vaishampayan Engagement : मुग्धा वैंशपायन आणि प्रथमेश लघाटे (Prathemesh Laghate) यांनी काहीच दिवसांपुर्वी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.यानंतर दोघांच्या केळवणाचे अनेक फोटो समोर आले होते. या दोघांच्या नात्याची चर्चा सुरु असतानाच आता त्यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचेही समोर आले आहे. दोघांनी मिळून सुचक शब्दात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवरून त्यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा रंगली आहे. (prathmesh laghate and mugdha vaishampayan engagement share post on social media saregamapa littele champ)

मुग्धा वैंशपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटेने (Prathemesh Laghate) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनला त्यांनी ”वाड्:निश्चय’ असे लिहत दोन हार्ट इमोजी शेअर केले आहे. या त्यांच्या पोस्टवरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. त्यामुळे मुग्धा आणि प्रथमेशने साखरपूडा उरकल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या साखरपुड्याची कुणालाच कल्पना नव्हती. अतिशय गुपचुप पद्धतीने दोघांनी त्यांचा साखरपुडा उरकला आहे.

हे ही वाचा : Gram Panchayat Election Results Live : महायुतीकडे 600 हून अधिक ग्रामपंचायती, महाविकास आघाडीकडे किती ग्रामपंचायती?

मुग्धा वैंशपायन आणि प्रथमेश लघाटेने त्यांच्या साखरपूड्याचे फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोत मुग्धाने केशरी रंगाची साडी परीधाण केली आहे. त्याचसोबत गळ्यात हार आणि हातात कड्या घातल्या आहेत. तर प्रथमेशने सदरा आणि डोक्यावर टोपी परिधान केली होती. दोघांच्याही या मराठमोळ्या लुकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर आता मुग्धा वैंशपायन आणि प्रथमेश लघाटेचे साखरपूड्यानिमित्त अभिनंदन केले जात आहे. एका युझरने त्यांच्या फोटोवर गोड दिसताय अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या युझरने लिहले की सेलिब्रिटी असूनही किती साध्या पद्धतीने साखरपूडा केला आहे. ही बाब नक्कीच कौतुकास्पद असल्याचे एका चाहतीने म्हटलंय. तसेच पारंपरिक मराठी पद्धतीने नटलेल्या ह्या जोडप्याला खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा,असे देखील तिने कमेंट केली आहे. सध्या दोघांच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

ADVERTISEMENT

हे ही वाचा :  Gram Panchayat Election Result 2023 : दिलीप वळसे पाटलांच्या गडाला सुरूंग

सारेगमप लिटिल चॅम्पपासून सुरु झालेला दोघांचा प्रवास आता रिलेशनशिपर्यंत पोहोचला आहे. या रिलेशनशिपनंतर दोघांनी आता साखरपुडा उरकला आहे. आता या दोघांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT