Rakhi Sawant : जामीन अर्ज फेटाळताच राखीला मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Rakhi Sawant : सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री राखी सावंत (Actress Rakhi Sawant) अडचणीत सापडलीये. राखी सावंतला मुंबईत पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेतलं आहे. गुरूवारी (19 जानेवारी) अंबोली पोलिसांनी (Amboli Police) राखीला शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) प्रकरणात ही कारवाई केलीये. दरम्यान, राखी सावंतला अटक करण्यात आल्याचा दावा शर्लिन चोप्राने केला आहे. तसं ट्विट तिने केलं आहे. (Rakhi Sawant arrested by Amboli police, as per a tweet by Sherlyn Chopra)

राखी सावंत आज (19 जानेवारी) दुपारी 3 वाजता तिच्या डान्स अकॅडमीचं उद्घाटन करणार होती. त्यापूर्वीच तिच्यावर कारवाई करण्यात आलीये.

अभिनेत्री शर्लिन चोप्राने मात्र राखी सावंतला अटक करण्यात आल्याचा दावा केलाय. तिने एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये शर्लिन चोप्राने म्हटलेलं आहे की, “अंबोली पोलिसांनी राखी सावंतला अटक केली आहे. राखी सावंतला एफआयआर 883/2022 च्या प्रकरणात अटक केलीये.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘मी इस्लाम स्वीकारला, फातिमा बनले’; राखी सावंत लव्ह जिहादबद्दल काय बोलली?

पुढे शर्लिन चोप्राने म्हटलंय की, “राखी सावंतची ABA1870/2022 मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.”

ADVERTISEMENT

राखी सावंतवर कारवाई : शर्लिन चोप्रा प्रकरण काय?

राखी सावंतने एका पत्रकार परिषदेत शर्लिन चोप्राचे काही फोटो आणि व्हिडीओ दाखवले होते. तसेच तिचं नावही घेतलं होतं. या प्रकरणी शर्लिन चोप्राने तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी भादंवि 354, 509 नुसार गुन्हा दाखल केला होता. 8 नोव्हेंबर 2022 रोजी राखीविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला होता.

ADVERTISEMENT

राखी सावंत विरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण..

या प्रकरणात राखी सावंतने जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई सत्र न्यायालयाने राखी सावंतचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राखी सावंतला ताब्यात घेतलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT