रितेश देशमुख विलासरावांच्या आठवणीत झाला भावुक.. पोस्ट शेअर करत म्हणाला.. ‘तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रितेश देशमुख एक अभिनेता म्हणून तर उत्तम आहेच शिवाय एक मुलगा, पती आणि बाबा म्हणूनदेखील तो सर्वोत्कृष्ट आहे असंच म्हणावं लागेल. अभिनेता आपल्या कुटुंबाशी किती कनेक्टेड आहे हे वारंवार दिसून येतं.

रितेश देशमुखने आयुष्यात बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या आहेत. त्याला कोणत्याही गोष्टीची उणीव नाही. परंतु एक व्यक्ती अशी आहे ज्यांच्या नसण्याची उणीव त्याच्या मनात कायम आहे.ती व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री आणि रितेशचे वडील विलासराव देशमुख हे होय.रितेश आपल्या वडिलांच्या फारच जवळ होता. त्याला सतत आपल्या वडिलांच्या आठवणीत भावुक होताना सर्वांनीच पाहिलंय.आज विलासरावांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने रितेशने पुन्हा एकदा आपल्या वडिलांसाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

विशेष म्हणजे या फोटोंमध्ये विलासरावांची नातवंडे अर्थातच रितेश आणि जेनेलियाची मुले त्यांच्या फोटोला पुष्प अर्पण करुन त्यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत.रितेशने हे फोटो शेअर करत एक अतिशय भावुक पोस्ट लिहिली आहे.या पोस्टमध्ये रितेशने लिहिलंय, ”मला तुम्हाला घट्ट मिठी मारुन वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. तुमच्या पायांना स्पर्श करुन तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मला तुम्हाला आनंदात पाहायचं आहे. प्रत्येक वेळी पाठीवर थाप देऊन मी सोबत आहे हे म्हणताना पाहायचं आहे. नातवंडांसोबत खेळताना, त्यांना पुढे घेऊन जाताना, त्यांना गोष्ट सांगताना पाहायचंय. मला तुम्ही हवे आहात. तुमची फार आठवण येते बाबा’आपल्या वडिलांसाठी अत्यंत भावुक पोस्ट शेअर करत रितेशने सर्वांनाच भावुक केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT