Sushan Singh Rajput ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचं गँग लीडर बनून कमबॅक, म्हणाली…

मुंबई तक

रिया प्रसिद्ध रिअॅलिटी शो MTV Roadies 19 (MTVRoadies19) मध्ये दिसून येणार आहे. प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटी यांच्यानंतर तिसऱ्या गँग लिडरचे नाव समोर आले आहे.

ADVERTISEMENT

Riya Chakraborty's comeback after 3 years of Sushant Rajput case, became gang leader in MTV Roadies 19
Riya Chakraborty's comeback after 3 years of Sushant Rajput case, became gang leader in MTV Roadies 19
social share
google news

Sushant Singh Rajput case :

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput case) मृत्यूला आता 3 वर्ष पूर्ण होतं आहेत. मात्र सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात अनेक प्रश्नांची उत्तर अद्याप तपास यंत्रणेला मिळालेली नाहीत. सुशांतच्या कुटुंबियांनी गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला (Riya Chakraborty) जबाबदार धरले होते. रियाविरुद्ध मीडिया ट्रायल झाली, ड्रग्ज प्रकरणात ती तुरुंगातही गेली. मात्र आता 3 वर्षांनंतर रिया चक्रवर्तीची कारकीर्द रुळावर येताना दिसत आहे. (Riya Chakraborty’s comeback after 3 years of Sushant Rajput case, became gang leader in MTV Roadies 19)

रिया चक्रवर्तीचे पुनरागमन :

अनेकांनी दावा केला होता की रियाचे करिअर आता संपले आहे. पण सर्व दावे धुळीत मिळवत रिया चर्कवर्ती दमदार पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. रिया प्रसिद्ध रिअॅलिटी शो MTV Roadies 19 (MTVRoadies19) मध्ये दिसून येणार आहे. प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटी यांच्यानंतर तिसऱ्या गँग लिडरचे नाव समोर आले आहे. मेकर्सनी रिया चक्रवर्तीचा प्रोमोही रिलीज केला आहे. यात तिची धमाकेदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने कोर्टात का माफी मागितली? काय आहे प्रकरण?

करिअर संपल म्हणणाऱ्यांना प्रतिउत्तर देत रिया म्हणाली, “आपको क्या लगा मैं वापस नहीं आऊंगी. डर जाऊंगी. डरने की बारी किसी और की है. मिलते हैं ऑडिशंस पर”. रोडीज या रिअॅलिटी शोमध्ये रियाला पाहून तिच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. हा शो ऑन एअर होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp