सायना नेहवालचा बायोपिक ओटीटीवर होणार रिलीज?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मराठी तसंच हिंदी सिनेमे डिजीटल म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येतायत. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री परिणीची चोप्रा हिचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. तर आता त्यानंतर परिणीतीचा बहुचर्चित सायना नेहवालचा बायोपिकही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

ADVERTISEMENT

गेल्या वर्षी सायना नेहवालचा बायोपिक रिलीज करण्यात येणार होता. मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या 50 टक्क्यांच्या क्षमतेवर थिएटर्स सुरु आहेत. यामुळे सायना नेहवालचा बायोपिक ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा विचार सुरु आहे. याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही.

सायना नेहवालचा हा बायोपिक येत्या काही महिन्यांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी श्रद्धा कपूर या बायोपिकमध्ये सायना नेहवालची भूमिका साकारत होती. मात्र काही कारणांनी या सिनेमात श्रद्धा ऐवजी परिणीती चोप्राला रिप्लेस करण्यात आलं. सायना नेहवालच्या या बायोपिकची चाहते उत्सुकतेने वाट पाहतायत.

हे वाचलं का?

तर परिणीती चोप्राचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ 26 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाला ओटीटी प्लॉटफॉर्मवर रिलीज करण्यात येणारे. हा सिनेमा हॉलिवूडच्या सिनेमाचा रिमेक असून प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर हा सिनेमा पाहता येणारे. नुकतंच या सिनेमाचा टीझरही लाँच झाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT