Gadar 2: सकीनासोबत रोमांटिक झाला तारा सिंह, 22 वर्षानंतरही जुळलीय सॉलिड केमिस्ट्री
आता सर्वजण गदर २ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून वेळ असला तरी निर्मात्यांनी नुकतंच त्यातील एक गाणे रिलीज केले आहे. उड जा काले कवन या चित्रपटाचे पहिले गाणं प्रदर्शित केलं आहे. हे सुपरहिट गाणं 22 वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाईल.
ADVERTISEMENT
Sakina Tara Singh’s romantic chemistry : Gadar 2 : ‘गदर’ चित्रपटाने 90 च्या दशकात सर्वांचेच मन जिंकले होते. जिथे-तिथे चर्चा होती ती तारा सिंग आणि सकिनाच्या प्रेमाची. त्यावेळी चित्रपटाला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटगृह हाऊसफुल होते. बॉक्स ऑफिसवर गदर चित्रपटाचाच बोलबाला होता. आता सर्वजण गदर २ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून वेळ असला तरी निर्मात्यांनी नुकतंच त्यातील एक गाणे रिलीज केले आहे. उड जा काले कवन या चित्रपटाचे पहिले गाणं प्रदर्शित केलं आहे. हे सुपरहिट गाणं 22 वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाईल. (Sakina Tara Singh’s romantic chemistry will rekindle after 22 years in Gadar 2)
ADVERTISEMENT
गदर 2 च्या पहिल्या गाण्याचे प्रदर्शन!
गदरमधील ‘उड जा काले कावा’ हे गाणं गदर 2 मध्ये रिक्रिएट करण्यात आले आहे. यात तारा सिंग आणि सकिना यांची धमाकेदार केमिस्ट्री तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. गदर 2 च्या पोस्टर्सशिवाय अमिषा पटेलची कोणतीही झलक आतापर्यंत समोर आलेली नाही. पण आता सगळ्यांच्या आवडत्या सकिनाचा लूक समोर आला आहे.
PUNE: दर्शना पवारच्या हत्येसाठी नराधम राहुलने राजगड आणि सोमवारच का निवडला?
तारा सिंग आणि सकिना यांना पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांच्या आनंदाला थारा नाही. गेल्या काही वर्षांत सनी-अमिषाचा लुकही खूप बदलला आहे. निर्मात्यांनी त्यांना जुन्या लुकमध्ये ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे.
हे वाचलं का?
तारा-सकिनाचा रोमँटिक अंदाज
गदरच्या अनेक सीन्सचा फ्लॅशबॅक गाण्यात दिसतो. सकिना तिच्या तारा सिंगकडे प्रेमाने पाहत असताना तुम्हीही नजर हटवू शकणार नाहीत. सनी आणि अमिषा प्रत्येक फ्रेममध्ये तुमचे मन जिंकतील. हे पाहून चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. सकिना-तारा यांची ही झलक पाहिल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की, त्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरता आहे आणि हा वेळ संपतच येत नाही. काहींनीतर आधीच गदरला ब्लॉकबस्टर घोषित केले आहे. एका यूजरने लिहिले की, ‘सनी पाजीला या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता फक्त 90 च्या दशकातील मुलेच समजू शकतात.’
Crime News : बेडरुमध्ये सुनेला बघून संतापलेल्या सासूने गोळीच घातली, कारण…
22 वर्षांनंतर पुन्हा गदरचाच बोलबाला दिसणार…
गदर हा चित्रपट 11 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 22 वर्षांनंतर पुन्हा बोलबाला होणार आहे. अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सनीच्या मुलाची भूमिका उत्कर्ष शर्माने केली आहे. गदरमध्ये दिसणारा हा मुलगा आता मोठा झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. त्याला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. टीझरमध्ये दाखवलेल्या डायलॉगची प्रशंसा झाली. गदरच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले. गदर-2 आपला 22 वर्षांचा इतिहास पुन्हा घेऊन येणार का? याचीच आता वाट पाहावी लागणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT