संजीवनी वाढदिवसानिमित्त देणार रणजीतला खास सरप्राईझ! काय असेल दादासाहेबांची खेळी ?
राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये बर्याच घटना बघायला मिळत आहेत. प्रेक्षक खूप महिन्यांपासून वाट बघत होते की, संजीवनीला कधी पोलिस वर्दीमध्ये बघता येईल. आणि अखेर संजु PSI बनली. PSI संजीवनीला प्रेक्षकांची पसंती देखील मिळत आहे. संजीवनीच्या आयुष्यातील संकट मात्र अजूनही कमी झालेली नाही. संजु PSI झाल्यापासून तिची जबाबदारी अधिकच वाढली आहे. पण संजीवनी घराची आणि […]
ADVERTISEMENT
राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये बर्याच घटना बघायला मिळत आहेत. प्रेक्षक खूप महिन्यांपासून वाट बघत होते की, संजीवनीला कधी पोलिस वर्दीमध्ये बघता येईल. आणि अखेर संजु PSI बनली. PSI संजीवनीला प्रेक्षकांची पसंती देखील मिळत आहे. संजीवनीच्या आयुष्यातील संकट मात्र अजूनही कमी झालेली नाही. संजु PSI झाल्यापासून तिची जबाबदारी अधिकच वाढली आहे. पण संजीवनी घराची आणि नोकरीची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडते आहे. या सगळ्यामध्ये रणजीत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. घरी राजश्री – अपर्णा आणि पोलिस स्टेशनमध्ये गुलाब नावाचं संकट संजीवनीची पाठ काही सोडत नाहीये, यामध्ये देखील रणजीतच्या आधारामुळे ती त्यावर मात करते आहे. संजीवनीच्या या खडतर प्रवासामध्ये घराच्यांच्या विरोधाला न जुमानता रणजीतच्या साथीने प्रत्येक अडथळे पार करत पुढे जात आहे. इतक्या महिन्यानंतर संजु आणि रणजीतच्या नात्यातील दुरावा दूर झाला आहे आणि सुखाचे क्षण त्यांच्या वाट्याला आले आहेत. पण ही कोणत्या संकटाची चाहूल तर नाहीये ना ? रणजीतला वाढदिवसानिमित्त खास सरप्राईझ मिळणार आहे, जे त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील असे संजीवनीने त्याला सांगीतले आहे. काय असेल हे खास गिफ्ट ? काय असेल दादासाहेबांचा प्लॅन? संजीवनीच्या हातून रणजीतला कोणतं मोठं सरप्राईझ ते देणार आहेत ? अपर्णा, राजश्री आणि दादासाहेब मिळून नक्की कोणती खेळी खेळणार आहेत ? राजा – रानीच्या सुखी संसारामध्ये पुन्हा एकदा कोणत वादळ येणार ? दादासाहेबांच्या या प्लॅनवर संजु रणजीतच्या साथीने कशी मात करेल ? एकमेकांच्या साथीने ते या संकटाला कसे उत्तर देतील ? हे बघणे उत्कंठावर्धक असणार आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT