Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा रिस्की ब्लाऊज अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

shilpa shetty risky blouse mermaid skirt photo viral bollywood actress
shilpa shetty risky blouse mermaid skirt photo viral bollywood actress
social share
google news

Shilpa Shetty Risky Blause :बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)  सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.आता असेच तिचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत ती खूपच बोल्ड दिसत आहे. एका मोठ्या इवेंट दरम्यान काढलेले हे फोटो आहेत. या फोटोत शिल्पा शेट्टी खूपच सुंदर दिसत आहेत. तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे शिल्पाचे हे फोटो पाहून ती खरचं 48 वर्षांची आहे, यावर कुणालाच विश्वास बसत नाही आहे. (shilpa shetty risky blouse mermaid skirt photo viral bollywood actress)

ADVERTISEMENT

एका इवेंटच्या कार्यक्रमा दरम्यान शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) रेड कार्पेटवर एन्ट्री मारली होती. शिल्पाने एन्ट्री मारताच सगळ्याच कॅमेराच्या लेन्स तिच्याकडे केंद्रीत झाल्या होत्या. यावेळी शिल्पाची बोल्डनेस आणि फिटनेस पाहून चाहते आश्चर्यचकीत झाले होते. विशेष म्हणजे शिल्पा दोन वर्षांनी वयाची पन्नाशी गाठणार आहे, तरी देखील तिची फिटनेस आणि बोल्ड लुक पाहून ती तिशीत देखील मोडत नसल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा : विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी तुटण्याचा धोका? समजून घ्या 5 संकेतांचे अर्थ

शिल्पाने या इवेंटमध्ये रिस्की फिटेड ब्लाऊज आणि मर्मेट स्कर्ट परिधान केला होता. या आऊटफिटमध्ये शिल्पा खुपच सुंदर दिसत होती. खरं तर शिल्पाने बस्ट लाईन ब्लाऊज परिधान केला होता, या ब्लाऊजला हाय नेकलाईन आणि फुल स्लीव्स होत्या. तर कमरेखाली तिने स्कर्ट घातला होता. हा स्कर्ट हिप आणि थाय पोर्शन फिट होता, यामध्ये रूश्ड पॅटर्न होता. तर गुडघ्यापासून पायापर्यंत प्लीट्स टाकून घेर जोडले होते. एकूणच त्यावर मणी, सेक्विन आणि स्टोन वर्क पाहायला मिळत होते. ब्लाउज आणि स्कर्टवर दिसणार्‍या फिरत्या रेषा तरंगांचे प्रतिनिधित्व करत होत्या. एकूणच या संपूर्ण लूकमध्ये एक जलपरी अवतरल्याचा चाहत्यांना भास होत होता.शिल्पाचे हे आऊटफीट शिवान आणि नरेश यांच्या लेटेस्ट कलेक्सनमधून घेण्यात आले होते. या लुकमध्ये शिल्पाने एन्ट्री करून चाहत्यांना आश्चर्यचकीत केले होते.

हे वाचलं का?

दरम्यान ही शिल्पा ही छोट्या पडद्यावरील अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे. या शोसह शिल्पाचा नुकताच सुखी हा सिनेमा आला होता. हा सिनेमा 22 सप्टेंबरला रिलीज झाला होता. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी असी कमाल दाखवू शकला नाही.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Fact Check: लंडनमधील ‘ती वाघनखं’ खरंच शिवाजी महाराजांनी वापरलेली, काय आहे सत्य?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT