गेल्यावर्षी असा झाला होता सोनाली आणि कुणालचा साखरपुडा!
काल मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना लग्न करून सुखद धक्का दिला. तर गेल्यावर्षी म्हणजेच 2020 मध्येही वाढदिवसाच्या दिवशी साखरपुड्याचे फोटो करत तिने गोड बातमी दिली होती. सोनालीने साखरपुड्याचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले होते. त्यावेळी सोनालीने “2 फेब्रुवारी 2020 रोजी आमचा साखरपुडा झाला. आमचा हा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आजच्या पेक्षा […]
ADVERTISEMENT


काल मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना लग्न करून सुखद धक्का दिला. तर गेल्यावर्षी म्हणजेच 2020 मध्येही वाढदिवसाच्या दिवशी साखरपुड्याचे फोटो करत तिने गोड बातमी दिली होती.

सोनालीने साखरपुड्याचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले होते. त्यावेळी सोनालीने “2 फेब्रुवारी 2020 रोजी आमचा साखरपुडा झाला. आमचा हा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आजच्या पेक्षा दुसरा दिवस असूच शकत नाही, असं मला वाटतं. तुमचे आशिर्वाद कायम पाठीशी असू द्या”, असं म्हटलं होतं.









