रैनानंतर हरभजन सिंगच्या मदतीलाही धावला अभिनेता सोनू सूद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लॉकडाऊनच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूद वेळेवर धावून आला. वेळोवेळी लोकांची मदत करत सोनू खऱ्या आयुष्यातंही हिरो बनला. अजूनही कोरोनाच्या कठीण काळात तो लोकांची मदत करतोय. नुकतंच सोनूने क्रिकेटर सुरेश रैनाला मदत केली होती. त्यानंतर आता माजी गोलंजाद हरभजन सिंग याच्या मदतीसाठीही सोनू धावून आलाय.

नुकतंच हरभरजनने रेमडेसिविर इंजेक्शन हवं असल्याचं म्हटलं होतं. हरभजनने यांसदर्भात ट्विट केलं होतं. हजरभजनने त्याच्या ट्विटमध्ये “एक रेमडेसिविर इंजेक्शन तातडीने हवं आहे”, असं म्हटलं होतं. शिवाय यासोबत त्याने रूग्णालयाची माहिती तसंच फोन नंबरही दिला होता. हे ट्विट सोनूने पाहिलं आणि त्याला ‘भज्जी, लवकरात लवकर पोहोचवतो’ असं म्हटलं.

त्यानंतर सोनूने तातडीने रेमडेसिविर औषध त्या गरजूपर्यंत पोहोचवलं. यानंतर हरभजन सिंगने सोनूने सूदचे आभार मानले. हरभजनने ट्विट करत धन्यवाद ब्रदर, असं म्हटलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान काही दिवसांपूर्वी सोनूने सुरेश रैनाचीही मदत केली होती. सुरेश रैनाने एक ट्वीट करत मेरठमध्ये राहणाऱ्या आपल्या मावशीला ऑक्सिजनची नितांत गरज असल्याचं सांगितलं होतं. सुरेश रैनाचं ट्वीट पाहताच सोनूने तातडीने त्यावर रिप्लाय देत 10 मिनिटात आपण ऑक्सिजनची व्यवस्था करत असल्याचं सांगितलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT