तापसी म्हणते, ….तर मी शिक्षा भोगण्यासाठी तयार

मुंबई तक

गेल्या बुधवारी अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरावर इन्कम टॅक्सने छापेमारी केली. यानंतर तापसीने ट्विट करत इन्कम टॅक्सच्या या छापेमारीवर नाराजीही व्यक्त केली होती. तर नुकतंच एका वृत्तवाहिनीशी बोलताना दोषी आढळल्यास दिलेली शिक्षा भोगण्यास तयार असल्याचं तापसीने सांगितलंय. तापसी म्हणते, “इन्कम टॅक्स विभागाने का घरावर छापा टाकला याबाबत मला काही माहिती नाही. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गेल्या बुधवारी अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरावर इन्कम टॅक्सने छापेमारी केली. यानंतर तापसीने ट्विट करत इन्कम टॅक्सच्या या छापेमारीवर नाराजीही व्यक्त केली होती. तर नुकतंच एका वृत्तवाहिनीशी बोलताना दोषी आढळल्यास दिलेली शिक्षा भोगण्यास तयार असल्याचं तापसीने सांगितलंय.

तापसी म्हणते, “इन्कम टॅक्स विभागाने का घरावर छापा टाकला याबाबत मला काही माहिती नाही. तसंच जर मी काहीही चुकीचं केलं असेन तर ते समोर येईल. जर या प्रकरणात मी दोषी आढळली तर मला शिक्षाही होईलच. आणि ती शिक्षा भोगण्यास मी तयार आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp