बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनची झाली घोषणा,लवकरच नवीन स्पर्धक जाणार बिग बॉसच्या घरात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

येणार येणार म्हणून ज्या बिग बॉस मराठीच्या पुढच्या म्हणजेच तिसऱ्या सिझनची सगळ्यांना उत्सुकता होती. तो सिझन लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कलर्स मराठीवर लोकप्रिय झालेल्या बिग बॉस मराठीच्या पुढच्या म्हणजेच तिसऱ्या सिझनची घोषणा आता झाली आहे. गेले दोन सिझन या शो चे होस्ट असणाऱ्या अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठी सिझन ३ ची सोशल मिडीयावर एक पोस्ट टाकत घोषणा केली. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की त्याच्यासोबत मी परत येतोय तुम्ही तयार राहा . या त्यांच्या घोषणेमुळे लवकरच बिग बॉसची दारं ही नवीन स्पर्धकांसह लवकरच उघडणार आहे

ADVERTISEMENT

गेली दिड वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे आणि लॉकडाऊन सुरू असल्याने कोणताही नवीन रियालीटी शो सुरू झाला नव्हता. गेलं पूर्ण वर्ष लॉकडाऊनमुळे चित्रिकरण रद्द झालं होतं. त्य़ामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा बिग बॉसचा सिझन ३ कधी येणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र काही दिवसांपूर्वी नियमांमध्ये थोड्या फार प्रमाणात शिथिलता आल्याने आता मुंबईत चित्रिकरणास हळू हळू सुरवात झाली आहे. बिग बॉसचा सेट मुंबईतील फिल्मसिटीमध्ये उभारण्यात येतो. त्याप्रमाणे आता या कामाला सुरवात झाली असून थोड्याच दिवसात या सिझनमध्ये कोण कोणते सेलिब्रेटी असतील हे स्पष्ट होईल आणि लवकरच बिग बॉसचा सिझन ३ ला कलर्स मराठीवर सुरवात होईल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT