गरजू लहान मुलांसोबत उर्मिला यांनी साजरा केला वाढदिवस
बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरचा आज वाढदिवस आहे. उर्मिला आज तिचा 47वा वाढदिवस साजरा करतेय. तर उर्मिलाने आज तिचा वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. मुंबईतील विलेपार्लेमध्ये शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री ऊर्मिला मातोडकरांनी वाढदिवस लहान मुलं तसंच वयस्कर महिलांसोबत साजरा केलाय. खास वाढदिवसाच्या निमित्ताने उर्मिला मातोंडकर यांनी लहान मुलांना आपल्या गाणी म्हणून दाखवली. त्याचप्रमाणे […]
ADVERTISEMENT
बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरचा आज वाढदिवस आहे. उर्मिला आज तिचा 47वा वाढदिवस साजरा करतेय. तर उर्मिलाने आज तिचा वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. मुंबईतील विलेपार्लेमध्ये शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री ऊर्मिला मातोडकरांनी वाढदिवस लहान मुलं तसंच वयस्कर महिलांसोबत साजरा केलाय.
ADVERTISEMENT
खास वाढदिवसाच्या निमित्ताने उर्मिला मातोंडकर यांनी लहान मुलांना आपल्या गाणी म्हणून दाखवली. त्याचप्रमाणे सर्वांसोबत केक कापून मस्ती सुद्धा केली. लहान मुलांनी देखील उर्मिला यांच्या वाढदिवसानिमित्त भरपूर धमाल केली आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. व्यतिरिक्त तमिळ, तेलगू, मल्याळम तसंच मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलंय. उर्मिला यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. काही काळापूर्वी उर्मिला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT