ज्येष्ठ अभिनेत्री, लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचं पुण्यात निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा!
Veteran Marathi actress and Lavani queen Madhu Kambikar passed away : ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचं पुण्यात वयाच्या 73 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. ‘शापित’, ‘एक होता विदूषक’ आणि ‘झपाटलेला’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ज्येष्ठ अभिनेत्री, लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचं पुण्यात निधन
मराठी कलाविश्वावर शोककळा!
Veteran Marathi actress and Lavani queen Madhu Kambikar passed away , पुणे : मराठी चित्रपटसृष्टी आणि लोककलेच्या क्षेत्रातून दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचं पुण्यात वयाच्या 73 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी आणि लोककलेच्या क्षेत्रातील एका महत्त्वाच्या पर्वाचा अंत झाला आहे. अस्सल लावणी, सहज अभिनय आणि ग्रामीण स्त्रीजीवनाचं प्रभावी चित्रण करणाऱ्या मधू कांबीकर यांनी आपल्या कलेच्या जोरावर रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं.
हेही वाचा : राहुल गांधींसह विरोधी पक्षांची 'ती' मागणी सरन्यायाधीशांनी फेटाळली, नेमकं कारण काय?
दीर्घकाळ आजाराशी झुंज दिल्यानंतर प्राणज्योत मालवली
मधू कांबीकर यांना 27 नोव्हेंबर 2016 रोजी लावणीच्या कार्यक्रमानंतर पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या वेळी त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचंही वृत्तांत नमूद करण्यात आलं होतं. या घटनेनंतर त्या अंथरुणाला खिळून होत्या. दीर्घकाळ आजाराशी झुंज दिल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीने मराठी कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : निर्जनस्थळी आढळला मृतदेह, हात अन् पाय गायब; महिलेला इतक्या क्रूरपणे कुणी संपवलं?
