निर्जनस्थळी आढळला मृतदेह, हात अन् पाय गायब; महिलेला इतक्या क्रूरपणे कुणी संपवलं?

मुंबई तक

हैदराबादमध्ये काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. महिलेचा मृतदेह जेव्हा सापडला तेव्हा तिचे हात आणि पाय गायब होते.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

निर्जनस्थळी आढळला मृतदेह

point

हात अन् पाय गायब

point

महिलेला इतक्या क्रूरपणे कुणी संपवलं?

Crime News : हैदराबादच्या नागोले परिसरामध्ये गेल्या 9 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. तिचा मृतदेह 100 फूट रोडजवळील एका निर्जनस्थळी आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेचे हात आणि पाय गायब होते. मृतदेहाची अवस्था पाहता तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अरुण नावाचा एक स्थानिक व्यक्ती त्या परिसरात गेला असता, त्याला हा मृतदेह दिसला आणि त्याने तातडीने डायल 100 द्वारे पोलिसांना याची माहिती दिली.

मृत महिला नेमकी कोण?

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळाजवळ सापडलेल्या आधार कार्डच्या मदतीने या महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. मंगम्मा असे या मृत महिलेचे नाव असून ती उस्मानिया युनिव्हर्सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मणिकेश्वर नगर येथे राहत होती. कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी ती कॅटरिंगचे काम करत असे. ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तातडीने तिच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली.

हे ही वाचा : सातारा : भूत काढण्याच्या बहाण्याने शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, भोंदूबाबा गजाआड

कामावर जाण्यासाठी निघाली, पण...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगम्मा ही 29 सप्टेंबर रोजी कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. मात्र, ती उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. तिचा कुठेही थांगपत्ता न लागल्यामुळे अखेर कुटुंबीयांनी उस्मानिया युनिव्हर्सिटी पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. गेल्या नऊ दिवसांपासून पोलीस आणि तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. अखेर नऊ दिवसांनंतर तिचा मृतदेह नागोले येथील एका निर्जन भागात अत्यंत विदारक अवस्थेत आढळून आला.

हे ही वाचा : MPSC आंदोलनाबाबत हायकोर्टातून मोठी अपडेट, न्यायालयाचं विद्यार्थ्यांना आवाहन, सरकारला निर्देश

हात आणि पाय गायब

सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, महिलेचे हात आणि पाय मृत्यूआधी कापले गेले की मृत्यूनंतर, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, मोकाट कुत्र्यांनी किंवा इतर जंगली प्राण्यांनी शरीराचे अवयव खाल्ले असावेत, या शक्यतेचीही पोलीस पडताळणी करत आहेत. शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि त्यामागील गुन्हेगारी कट उघडकीस येईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.