‘हा निव्वळ मूर्खपणा…’ Poonam Pandey निधनाची Instagram पोस्ट म्हणजे फक्त…

रोहित गोळे

ADVERTISEMENT

what a cheap joke poonam pandey is alive news of her instagram post of death was fake people angry on social media
what a cheap joke poonam pandey is alive news of her instagram post of death was fake people angry on social media
social share
google news

Poonam Pandey death News: मुंबई: आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या (Poonam Pandey) मृत्यूच्या बातमीने लोकांना मोठा धक्का बसला होता. पूनम पांडेने एक इंस्टाग्राम (Instagram) पोस्ट शेअर करत असं म्हटलं होतं की, अभिनेत्रीचा गर्भाशयाच्या कर्करोगाने (Cervical Cancer) मृत्यू झाला आहे. पण असं असलं तरी हा एक निव्वळ प्रसिद्धीसाठीचा स्टंट होता. कारण, आता पूनम पांडे जिवंत असल्याचे समोर आलं आहे. तिने स्वत:च याबाबतचा व्हिडीओ आता इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (what a cheap joke poonam pandey is alive news of her instagram post of death was fake people angry on social media)

पूनमच्या मृत्यूच्या बातमीनंतर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते की, हा नक्कीच पब्लिसिटी स्टंट असेल. सुरुवातीला लोक विचारत होते की तिचा कसा आणि कधी मृत्यू झाला, तिचा मृतदेह कुठे आहे? तिला कॅन्सर झालाय तर कोणालाच कसं कळलं नाही? असे अनेक प्रश्न शुक्रवारपर्यंत सोशल मीडियावर विचारले जात होते. त्यामुळे पूनमने काही तरी स्टंट केला असेल असा लोकांना संशय होताच जो आता खरा देखील ठरला आहे. पण याच स्टंटबाजीमुळे ‘पूनम हा काय मूर्खपणा आहे?’ असा थेट सवाल यूजर्स आता तिला विचारत आहे.

आज सकाळपासूनच (शनिवारी) सोशल मीडियावर अनेक जण ट्वीट करत होत की, पूनम नक्कीचट जिवंत आहे. तसेच तिच्या मॅनेजरकडून मृत्यूची पुष्टी हा संपूर्ण प्रसिद्धीचा स्टंट असल्याचंही यूजर्स म्हणत होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> बहिणीनेच दिली होती पूनमच्या मृत्यूची बातमी, आता सगळ्या कुटुंबाचे फोन बंद, नेमकं सत्य काय?

एका यूजरने लिहिलेलं- ‘काल आम्ही ऐकले की पूनम पांडेचा मृत्यू झाला आणि आज आम्ही ऐकत आहोत की पूनम पांडे जिवंत आहे. तिचा कथित मृत्यू हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे दिसून येत आहे.’

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

 

एका यूजरने लिहिले की, ‘हा एक वाईट विनोद आहे, हा निव्वळ मूर्खपणा आहे.’ असे पब्लिसिटी स्टंट कोण करतं?

एका यूजरने लिहिले- लोक म्हणत आहेत पूनम पांडे जिवंत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाने इतक्या लवकर कोणीही मरत नाही. दुसरे म्हणजे ती कानपूरमध्ये नव्हती. जर तो स्टंट असेल तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील.

हे ही वाचा>> Poonam Pandey जिवंत आहे… Video च केला शेअर; म्हणते कशी मी तर…

आणखी एका यूजरने लिहिले- पूनम पांडे मेली आहे का? ती जिवंत आहे का? सोशल मीडियावर सुरू असलेला हा पब्लिसिटी स्टंट होता का? कोणी सत्य सांगेल का? मी प्रार्थना करते की ती अजूनही जिवंत आहे.

एका यूजरने लिहिले- आम्हाला विश्वास आहे की पूनम पांडे जिवंत आहे. तिच्या मृत्यूच्या बातमीद्वारे ती पब्लिसिटी स्टंट करत आहे.

स्वत:च्या मृत्यूची बातमी आणि नंतर जिवंत असल्याचा Video केला शेअर..

शुक्रवारी पूनम पांडेच्या टीमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून निवेदन जारी केले होते. त्यात लिहिले होते, ‘आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी खूप कठीण आहे. आम्ही आमच्या लाडक्या पूनमला गर्भाशयाच्या कर्करोगाने गमावले. हे जाहीर करताना आम्हाला अतोनात दुःख होत आहे. तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तिने पूर्ण प्रेम आणि दयाळूपणा दिला. या दुःखाच्या काळात, आम्ही चाहत्यांकडून तिच्या गोपनीयतेची विनंती करतो जेणेकरून आम्ही तिला कायम लक्षात ठेवू शकू.’

त्यानंतरही अनेकांनी या बातमीवर शंका व्यक्त केली होती आणि प्रतिक्रिया दिल्या होत्या की, तिला गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करायची आहे की तिचे अकाउंट हॅक झाले आहे?

मात्र, आता या सगळ्या बातमीमागचं सत्य पूर्णपणे समोर आलं आहे. हा खरोखरच सगळा स्टंट होता. स्वत: पूनमने आपण गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी जागृती करण्यासाठी निधनाची पोस्ट केली होती. ‘माझे निधन झाले नसून मी जिवंत आहे.’ असं यावेळी पूनमने म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT