झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित ‘झॉलीवूड’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला
विदर्भात प्रचंड लोकप्रिय असलेल्या ‘झाडीपट्टी’ या नाटकाच्या खास प्रकारावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘झॉलीवूड’ असं या चित्रपटाचं नाव असून येत्या 9 एप्रिलला रिलीज होणार आहे. नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक तृषांत इंगळे यांनी स्वतः झाडीपट्टी नाटकांमधून बालकलाकार म्हणून काम केलंय. विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी […]
ADVERTISEMENT
विदर्भात प्रचंड लोकप्रिय असलेल्या ‘झाडीपट्टी’ या नाटकाच्या खास प्रकारावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘झॉलीवूड’ असं या चित्रपटाचं नाव असून येत्या 9 एप्रिलला रिलीज होणार आहे. नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
चित्रपटाचे दिग्दर्शक तृषांत इंगळे यांनी स्वतः झाडीपट्टी नाटकांमधून बालकलाकार म्हणून काम केलंय. विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. मात्र, झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहे. चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या विचाराने तृषांत यांनी वयाच्या 16व्या वर्षी मुंबई गाठली. त्यानंतर लेखन, कास्टिंग डिरेक्शनचा अनुभव घेत आता ‘झॉलीवूड” या चित्रपटाच्या रुपानं त्यांनी पहिला चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
हे वाचलं का?
विशबेरी फिल्म्सच्या प्रियंका अगरवाल, अंशुलिका दुबे, शाश्वत सिंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून अमित मासूरकर आणि डयुक्स फार्मिंग फिल्म्स चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. “न्यूटन”, “सुलेमानी किडा” असे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केलेले अमित मासूरकर या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर देखील आहेत.
चित्रपटाची कथा आसावरी नायडू, पटकथा तृषांत इंगळे, योगेश राजगुरू यांनी छायांकन तर वैभव दाभाडे यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटाला फ्रान्समधील इंडियन फेस्टिव्हल ऑफ तौलौसमध्ये स्पेशल ज्युरी अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT