अपर्णा सेन यांच्या ‘The Rapist’ या सिनेमाची इतकी चर्चा का होते आहे?
दिग्गज अभिनेत्री आणि सिनेदिग्दर्शक अपर्णा सेन यांनी त्यांच्या करिअरमधला तिसरा हिंदी सिनेमा तयार केला आहे. या सिनेमाचं नाव आहे The Rapist. या सिनेमाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते आहे. याचं कारण हा सिनेमा बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियरसाठी निवडला गेला आहे. एवढंच नाही तर जी सिओक अवॉर्डसाठीही नॉमिनेट झाला आहे. BIFF ने प्रीमियर होण्याआधी द रेपिस्ट […]
ADVERTISEMENT

दिग्गज अभिनेत्री आणि सिनेदिग्दर्शक अपर्णा सेन यांनी त्यांच्या करिअरमधला तिसरा हिंदी सिनेमा तयार केला आहे. या सिनेमाचं नाव आहे The Rapist. या सिनेमाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते आहे. याचं कारण हा सिनेमा बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियरसाठी निवडला गेला आहे. एवढंच नाही तर जी सिओक अवॉर्डसाठीही नॉमिनेट झाला आहे. BIFF ने प्रीमियर होण्याआधी द रेपिस्ट या सिनेमाचा एक ऑफिशियल ट्रेलर रिलिज केला आहे.
द रेपिस्टची गोष्ट दोन महिलांविषयीची आहे. थंडी पडलेली असताना एका रात्री या दोघी बाहेर असतात. तिथे दोन मुलं बाईवरून येऊन या दोघींची छेड काढण्याचा प्रयत्न करतात. या महिला त्यांना मुलंच आहेत असं समजून ओरडतात आणि तिथून जायला सांगतात. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना एका निर्जन भागात दोन महिला बेशुद्ध अवस्थेत सापडतात. त्या महिलांच्या जवळ त्यांची अंतर्वस्त्रही पडलेली असतात. चौकशी केल्यावर पोलिसांना हे समजायला वेळ लागत नाही की हे सगळं प्रकरण बलात्काराचं आहे.
सिनेमाचा ट्रेलर
या महिलांसोबत गैरवर्तन करणारा मुलगा पकडला जातो. पोलीस त्याला फक्त चुकीची वागणूक देतात असं नाही तर त्याची खिल्लीही उडवतात. दुसरीकडे या भयंकर अनुभवातून गेलेली एक महिला क्रिमनिल सायकॉलॉजी म्हणजेच गुन्हेगारांचं मानसशास्त्र हा विषय शिकवणारी प्राध्यापक आहे. या महिलेचं सगळं आयुष्यच या प्रसंगाने बदलून जातं. मात्र तरीही तिला हे जाणून घ्यायचं असतं की अशी काय मानसिकता आहे ज्यामुळे एक साधासरळ वाटणारा मुलगा, रेपिस्ट झाला. तिचा हा शोध तिला कुठे घेऊन जातो यावर हा सिनेमा भाष्य करतो.