Vikram Gokhale : विक्रम गोखलेंचे ‘हे’ चित्रपट कायम राहतील आठवणीत, तुम्ही बघितले आहेत का?
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं. गेल्या १५ दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखलेंनी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं होतं. रंगभूमीवरील नावाजलेले कलाकार म्हणून त्यांची ओळख होती. पण, त्यांचे असे काही चित्रपट आहेत, जे त्यांच्या निधनानंतरही आपल्याला कायम लक्षात राहतील… विक्रम […]
ADVERTISEMENT

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं. गेल्या १५ दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखलेंनी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं होतं. रंगभूमीवरील नावाजलेले कलाकार म्हणून त्यांची ओळख होती. पण, त्यांचे असे काही चित्रपट आहेत, जे त्यांच्या निधनानंतरही आपल्याला कायम लक्षात राहतील…
विक्रम गोखले यांचं चित्रपटसृष्टीतील योगदान मोठं आहे. 1989 मध्ये आलेल्या सुखी जोडप्याच्या आयुष्यावर आधारित कळत नकळत हा सिनेमा चांगलाच हिट झाला होता. मनोहर असं त्यांच्या व्यक्तीरेखेचं नाव होतं.
गोखलेंचं मराठी प्रमाणेचं हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव होतं. त्यांनी १९७१ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या परवाना चित्रपटातून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली होती.
विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, ‘बॅरिस्टर’ अजरामर करणाऱ्या अभिनेत्याची एक्झिट










